कोल्हापूरात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावरून अंनिस आणि युवा सेना आमनेसामने

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीनं शिवमहोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आलेल आहे. या शिव महोत्सवात सायंकाळी ४ वाजता इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे इंदूरीकर महाराजांचा कार्यक्रम समर्थनार्थ युवा सेना उतरली … Read more

शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोंगी भजन कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेत लोकसाहित्य उत्सव मराठीचा या अंतर्गत रघुनाथ साळोखे यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रस्तुतच्या भजनी मंडळ यांनी गण, जोतिबाची काठी आणि दत्त दर्शनाचा सोहळा या … Read more

”अंगापेक्षा बोंगा मोठा’, कंटेनर चालकाला अतिआत्मविश्वास नडला

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मणेर मळा ते शिवाजी विद्यापीठाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सरनोबतवाडी येथील उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकून पडल्याने येथील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली. कमी उंचीच्या पुलाचा अंदाज न आल्याने हा कंटेनर अडकला. हा कंटेनर गोव्याकडे जाण्यासाठी या पुला खालून जाण्याचा प्रयत्न करीत होता. कंटेनर चालकाच्या अति आत्मविश्वासामुळे तो मध्येच अडकला होता. … Read more

कोल्हापूरात मनपा पाणी पुरवठा अधीक्षकांना शिवीगाळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा अधीक्षकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना कोल्हापूरच्या बिंदू चौक परिसरात घडलीय. थकबाकीदार असणाऱ्या बारागिर कुठुमबिया कडे पाणी पट्टी वसुली मोहीम राबवत असताना हा प्रकार घडलाय. बारागिर यांचे कडून अधिक्षकांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या महिनाभरापासून थकबाकीदार असणाऱ्या नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली केली … Read more

जातीच्या दाखल्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांना पत्रे द्या- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जातीच्या दाखल्यामुळे प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना पत्रे पाठवावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज झाली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याण निरीक्षक के.आर. … Read more

शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय ‘टेक्नोसिस 2020’ स्पर्धा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभामध्ये “TECHNOSIS 2020” या राज्यस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाट्नासाठी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.पी.एस. पाटील हे प्रमुख आतिथी म्हणुन उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप. एस.बागी यांनी भुषविले होते. प्रा.डॉ.पी.एस.पाटील … Read more

कोल्हापूरात महास्वच्छता अभियानात तब्बल ८ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये ८ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा त्र्येचाळीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, स्वरा फाउंडेशन कार्यकर्ते, स्वच्छता दुत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी स्वंयसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ … Read more

चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई एसीबीच्या जाळयात; लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर गुन्हयात मदत करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव गणपती पोवार वय ४५ रा. महागाव ता. गडहिंग्लज याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई सोमवारी सकाळी झाली. याबातची फिर्याद २६ वर्षीय युवकाने दिली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व … Read more

CAA कायद्या विरोधात कोल्हापूरात हजारो नागरिकांचा एल्गार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून CAA, NRC आणि NPR विरोधात एल्गार पुकारला आहे. श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज , जेष्ठ नेते एन. डी. पाटील, जेष्ठ विचारवंत गणेश देवी, जेष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार , महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केल. कोल्हापूरच्या दसरा चौकात सकाळ पासून हजारो नागरीक एकत्र … Read more

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोककला महोत्सव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजितज करण्यात येतात. या वर्षा महाराष्ट्र शासनाने ‘लोकसाहित्य: उत्सव मराठीचा’ ही संकल्पना देऊन लोकसाहित्याशी निगडित कार्यक्रम करण्याचे अवाहन केले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दिनांक २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. दिनांक २६ फेब्रुवारी, … Read more