शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोककला महोत्सव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजितज करण्यात येतात. या वर्षा महाराष्ट्र शासनाने ‘लोकसाहित्य: उत्सव मराठीचा’ ही संकल्पना देऊन लोकसाहित्याशी निगडित कार्यक्रम करण्याचे अवाहन केले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दिनांक २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

दिनांक २६ फेब्रुवारी, २०२० रोजी दुपारी १२ वाजता लोककला महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. जात्यावरील ओव्या (सावित्रीबाई लोककला पथक, धंदवडे), धनगरी ओव्या (बिरदेव भैरुसिद्ध ओवीकार मंडळ, कुरळप), गजनृत्य (बिरोब गजनृत्य वागूल मंडळ, आरेवाडी), गणगवळण (शाहीर सुरेश कांडगावकर आणि सहकारी), लावणी आणि बैठकीची लावणी (सुनीता कांडगावकर आणि सहकारी), भेदिक शाहिरी (शाहिर हिंदुराव पाटील आणि सहकारी), राष्ट्री शाहिरी (शाहिर रंगराव पाटील आणि सहकारी), झिम्मा फुगडी (जिजाऊ लोककला व लेझीम पथक, धुंदवडे), पोतराज (अंकुश कसबे), वासुदेव (रणवीर वासुदेव) हे कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. तर २७ फेब्रुवारी, २०२० ‘उत्सव माय मराठीचा’ हा मराठी लोकगीतांचा सांगितिक कार्यक्रम आणि ‘रेडिसो बटाटा’ ही लघुनाटिका शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागामार्फत सादर केली जाणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांच्या शुभहस्ते आणि प्र-कुलगुरू प्रा.डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत दिनांक २६ फेब्रुवारी, २०२० रोजी संपन्न होत आहे. दोन्ही कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर सभागृहात आयोजित करण्यात आले असून सर्वांनी कार्यक्रमांचा लोभ घ्यावा असे अवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव विलास नांदवडेकर आणि मराठी विभाग प्रमुख प्रा.रणधीर शिंदे यांनी केले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment