पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…! धनंजय मुंढेंचा आशिष शेलारांना टोला
पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे.
पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव (ता.हातकणंगले) येथे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी पहिली ऐतिहासिक परिषद भरली होती. याचा शताब्दी महोत्सव समारंभ 21 मार्च, 2020 रोजी माणगांव (ता.हातकणंगले) येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री … Read more
सत्कार सोहळ्यात सर्व माध्यमांची नजर धनंजय मुंडेंकडे असताना धनुभाऊंची गुप्त नजर मात्र या माध्यमांकडेच होती. कोण, कशी आणि किती धडपड करतंय हेच जणू धनुभाऊंनी त्यांच्या माणसांना टिपायला लावलं होतं. सत्काराचं लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या पत्रकारांची धडपड पाहून त्यांच्यासाठी एक संदेश धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहला आहे.
बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more
विशेष प्रतिनिधी | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना विधानसभा निवडणुकीत धुळ चारली होती. त्यानंतर पंकजा यांनी पराभव मान्य करत पक्षाच्या मिटींगला हजेरी लावणे सुरु केले होते. मात्र पंकजा यांच्या पराभवात त्यांच्याच पक्षातील काही बड्या नेत्यांचा … Read more
सत्तासंघर्षाच्या गदारोळात सकाळपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या ठरलेल्या बैठकीत उपस्थित झाले आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आमदारांची बैठक योजित केली आहे. या बैठकीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर चर्चा होत आहे. त्यामुळं सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या अज्ञातवासात गेल्याने संशयाचं वातावरण तयार झालं होत. मात्र, आता धनंजय मुंडे बैठकीच्या ठिकाणी अचानक उपस्थित झाले असून. यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित आहेत. ही बैठक संपल्यावर मुंडे नेमकी काय प्रतिक्रिया देणार यावर आता सर्वांचं लक्ष लागून आहे
मुंबई प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा मागील महिनाभरात महाराष्ट्रातील जनतेने अनुभवली. निवडणूक प्रचारावेळी तुम्ही कुणाच्याही नादाला लागा पण शरद पवारांच्या नादाला लागू नका असं सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांनीसुद्धा शनिवारी सकाळी अजित पवारांसोबत शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय … Read more
राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे. धनंजय मुंडे ट्वीटमध्ये म्हणतात, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत आहेत. तर दुसरीकडे १८ तारखेला याच परळीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून भाजप उमेदवार दहशतीत आहेत, असं सांगत नरेंद्र मोदीच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणलं तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असा दावा धनंजय मुंडेंनी केला.