पी. चिदंमबरम यांच्यावरील कारवाईत आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही- नितीन गडकरी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘भाजपा’चे नेते नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तास्थापनेबाबत नितीन गडकरींच ‘हे’ विधान खरं ठरलं

आजची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात अचंबित करणारी ठरली. इतके दिवस सत्तास्थापनेच्या चर्चेत भाजप गायब होती तर तिकडे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात नवं नातं सरकारस्थापनेच्या निमित्ताने तयार होत असताना. अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात भाजपने गनिमी काव्याचा वापर करत सत्तास्थानेच दावा केला, तो ही राष्ट्रवादीची बुलंद तोफ असणाऱ्या अजित पवार यांच्या मदतीने. अशाप्रकारे फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

हिंदुस्थानातं चमच्यांची सुद्धा कमतरता पडली आहे का?- नितीन गडकरी

‘देशभरातील उद्योग व्यवसायसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात आहे. ही माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलो की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?’ असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

मत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या खालोखाल सर्वाधिक प्रचारसभा नितीन गडकरी यांनी घेतल्या होत्या. यावेळी केंद्रात रस्ते, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीपद भूषवणाऱ्या नितीन गडकरी यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केलं. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणं अत्यावश्यक असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

भाजपचे दिग्गज नेते येथून लढणार…

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १८२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत भाजपचे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांचेही नाव या यादीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा या यादीत समावेश आहे. नरेंद्र … Read more

माझे पंतप्रधान पदाशी काहीही देणेघेणे नाही -नितीन गडकरी

Untitled design

नवी दिल्ल्ली प्रतिनिधी | नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले कि,’ मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बिलकुल नाही, मी संघाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, देशसेवा हेच माझे मिशन आहे.’ नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येण्याची शक्यता असल्याचे राजकीय चर्चा सुरु … Read more