पंढरपूरातील किर्तनकारांचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

सोलापूर प्रतिनिधी । किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेकांनी या प्रकरणी आपली मतं मांडली आहेत. इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचा अनेकानी निषेध ही केला आहे तर आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा वारकरी-फडकरी … Read more

माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरात माघी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. अशातच कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले आहे. वारी काळात कोरोना व्हायरस पसरू नये. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार ही केले जाणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्यासह पाच … Read more

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपूर परिसरातील सुमारे अकराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार ठकसेनांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूरमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळया घालून हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बापू भागवत यांची आज दुपारी गोळया घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या अज्ञात हल्ले खोरांनी बापू भागवत यांची दिवसा ढवळया गोळया घालून हत्या केली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येखोरांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. … Read more

विष्णूपदाच्या  दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांची गर्दी

पंढरपूर प्रतिनिधी | वारकरी परंपरेत मार्गशिर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व असते. या महिन्यात भगवान पांडुरंग हे गोपाळपूर जवळील चंद्रभागेतील विष्णूमंदिरात वास्तव्यास जातात. या महिन्यात भाविक विठ्ठलाच्या दर्शऩासाठी मंदिरात न जाता ते विष्णूपदाच्या दर्शऩासाठी अवर्जून हजेरी लावतात. चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरापासून दक्षिणेस दीड किलोमीटर अंतरावर भगवान विष्णूचे मंदिर आहे. मंदिराला विष्णूपद म्हणून ओळखले जाते. येथे रुक्मिणीच्या सोधासाठी … Read more

पंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं चाललंय काय? दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा विरोधात प्रचार सुरूच

मीच काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार असून माझा प्रचार व्यवस्थित सुरू आहे. माझ्यावर कोणतीही कारवाई केली नाही असा दावा पंढरपूरमधील काँग्रेस उमेदवार शिवाजीराव काळूंगे यांनी केला आहे.

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे भोसले यांच्यासारख्या स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक खर्च वसूल करून सहा वर्षे निवडणूक लढविण्यास मनाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वेपायन वरखेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी ठेवल्या होत्या या दोन अटी ; भाजप पक्ष श्रेष्ठींनी हिरवा सिंग्नल देतात राजेंनी केली पक्षांतराची घोषणा

लोकसभेचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या स्वार्थासाठी खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लादली जाणार आहे. यासाठी 20 ते 25 कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला ही चाट लागणार आहे.

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

यामुळे खासदार उदयनराजे भोसले व इतर लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी राजीनामा दिल्यास अशा उमेदवाराकडून निवडणुकीचा खर्च वसूल करून त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यास मनाई करावी, अन्यथा त्यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वेपायन वरखेडकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विसर्जन मिरवणूक पारंपारीक पद्धतीर, पहा व्हिडिओ

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील गणेश विसर्जन मिरवणूकीला उत्साहात सुरवात झाली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते गणपतीचे पूजन करून मिरवणूकीला सुरवात झाली. गणेश विसर्जन मिरवणूकीत यंदाही पारंपारिक लेझीम संघ सहभागी झाले आहेत. या शिवाय हालगीचा खणखणनाट आणि बॅन्डच्या सुमधूर स्वर आणि येथील ज्ञानेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकर्‍यांनी टाळ मृदगांच्या ठेक्यावर धरलेल्या … Read more

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

#गणेशोत्सव २०१९ | विठ्ठल रूक्मिणी मंदिरात गुलाबी कन्हेरी फुलांची आरास

सोलापूर प्रतिनिधी | आज गणेश चतुर्थी निमित्ताने येथील सावळया विठुरायाला दुर्मिळ कन्हेरी फुलांची आरास करण्यात आली आहे. कन्हेरी फुलांच्या माळा तयार करून विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला आहे. मंदिरातील सजावटीसाठी खासकरून कर्नाटकातील बंगळुरू येथून 100 किलो गुलाबी रंगाची कन्हेरी फुले मागवण्यात आली आहेत. गुलाबी रंगाच्या कन्हेरी फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. कन्हेरीची फुलं ही … Read more