व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं चाललंय काय? दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा विरोधात प्रचार सुरूच

सोलापूर प्रतिनिधी | मीच काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार असून माझा प्रचार व्यवस्थित सुरू आहे. माझ्यावर कोणतीही कारवाई केली नाही असा दावा पंढरपूरमधील काँग्रेस उमेदवार शिवाजीराव काळूंगे यांनी केला आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे भारत भालके हे राष्ट्रवादीत गेल्याने आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचे जागा वाटपात ठरले होते. पण आघाडीतील काँग्रेस पक्षानेही पंढरपूरात आपला उमेदवार दिला. त्यांना एबी फाॅर्म सुध्दा दिला. त्यामुळे पंढरपूरात आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झाले आहे. आपण काँग्रेसचे पहिल्यापासून निष्ठावान कार्यकर्ते असून आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून काही लोक प्रयत्नशील असल्याचं काळूंगे यांनी सांगितलं. विधानसभा लढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असून निवडून आल्यानंतर पाणीप्रश्न, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न, महिला सक्षमीकरणाचा प्रश्न सोडवण्याकडे प्राधान्य असल्याचं पुढं बोलताना ते म्हणाले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काळूंगे यांच्यावर दबाव होता. पण ते नाॅट रिचेबल असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज राहिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढल्यास त्याचा महायुतीमधील उमेदवाराला फायदा होईल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

इतर काही बातम्या-