भीमा कोरेगाव दंगल हे भाजप सरकारचंच षडयंत्र, शरद पवारांचा गंभीर आरोप

१ जानेवारी २०१८ साली पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे झालेली दंगल ही भाजप पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्याची पोलीस यंत्रणा वापरत ही दंगल घडवून आणल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत राहुल फटांगळे या युवकाला आपला जीव गमवावा लागला

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेब आजही प्रेरणा देतात असं म्हटलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या आवाजातील मजकूर देत बाळासाहेबांना अभिवादन करणारा खास व्हिडियो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

मुंबई ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या नाइट लाइफच्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे.

ज्यांना जनतेनं नाकारलं तेच आता खोटं बोलत आहेत; CAA कायद्यावरून मोदींचा काँग्रेसवर आरोप

भाजपच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्याचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन केले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी CAA कायद्याबाबत काँग्रेसवर जनतेत अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

दादा खरं बोलले, मेगाभरतीमुळेच भाजपनं सरकार घालवलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.

माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला; चंद्रकांत पाटील यांनी घेतला मेगाभरती विधानावरून यु-टर्न

”भाजपमध्ये काही मागावं लागत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांना आपोआप मिळतं. ही भाजपची संस्कृती आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या मेगाभरतीमुळं ही संस्कृती कुठंतरी ढासळली. मेगाभरती ही चूकच होती,” असं जाहीर विधान काल चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.

”मोदींना पेढेवाले म्हणणाऱ्यांबरोबर भाजपा असल्याचा आनंद”; शिवसेनेचा सामनातून भाजपला टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी विचारणा करत वादाला आमंत्रण दिलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने मैदानात उडी घेत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांचे वक्तव्य हा शिवरायांचा अपमान आहे असं म्हणत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं भाजपच्या टीकेला आज समानाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं. शिवसेनेनं उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुन अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे.

‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं. 

अर्ध्यावरच डाव मोडला म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका; दानवेंचा ठाकरे सरकारला खोचक सल्ला

”तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका” असा कोचक सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला. राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला त्यावेळी दानवेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणातून फटकेबाजी केली.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? – संजय राऊत

मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज नरेंन्द्र मोदी यांच्या जीवणावरील एक पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित केले. मात्र यामध्ये नरेंन्द्र मोदी यांची तुलना शिवजी महाराजांसोबत केल्याने वाद उफाळून आला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आज के शिवाजी – नरेंन्द्र मोदी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विविध स्तरांतून सदर पुस्तकाचा निषेध नोंदवला जात आहे. शिवसेना … Read more