राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर? देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सतत सरकारचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. पर्यायाने सरकारवर आरोपांचे सत्र ही सुरूच आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि … Read more

राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत १ हजार कोटींचे कर्ज रोखे काढले विक्रीस

मुंबई । राज्य शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३’ अंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. शासनाच्या अधिसूचनेमधील नमूद अटी आणि शर्तींनुसार विक्री प्रक्रिया होईल. या कर्जाव्दारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी करण्यात येणार, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज २०२० … Read more

सरकारने सुरु केली LIC च्या IPO ची प्रक्रिया; पॉलिसी खरेदी केलेल्यांवर काय परिणाम होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओ मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग दिला आहे. कंपनीतील भागभांडवल विक्रीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अ‍ॅडव्हायझर नेमणूक करण्यासाठी निर्गुंतवणूक विभागाने निविदा मागविल्या. त्याची अंतिम तारीख 13 जुलै निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे 2.10 लाख … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

फक्त ४९९ रुपयांत ५ लाखांचे इंन्श्योरंस कव्हर; कोरोना संकटात प्रवास करत असाल तर मिळेल फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार आता देशभरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन बंद करत आहे. यासह देशभरातील देशांतर्गत पर्यटन उद्योगही हळूहळू वेग धरू लागलेला आहे. हे लक्षात घेता, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या ‘PhonePe ‘ने नुकतेच एक विशेष इन्शुरन्स कव्हर सुरू केले आहे. ही योजना एक डोमेस्टिक मल्टी इन्शुरन्स कव्हर आहे, जे PhonePe ने आयसीआयसीआय लोम्बार्ड सह सुरू केलेली … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं; बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण … Read more

पुढचे दोन आठवडे पेट्रोल -डिझेल मध्ये दर वाढ सुरूच राहणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. तेल कंपन्यांकडून सोमवारी सलग नवव्या दिवशी दरांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी दिल्लीतील पेट्रोलचे ७५.७८ रु प्रति लिटर दर आज ७६. २६ झाले आहेत. तर रविवारी ७४.०३ रु भाव असणाऱ्या डिझेलचे भाव ७४.६२ रु प्रति लिटर झाले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात या दरांमध्ये … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more