IMD ने ‘या’ राज्यांसाठी जारी केला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छ येथे आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असे सांगितले आहे की दक्षिण राजस्थानवर सध्या कमी दाबाची परिस्थिती आहे, जी येत्या दोन दिवसांत पश्चिमेकडे सरकू शकते. त्याचबरोबर, येत्या दोन दिवस चक्रीय वादळाची परिस्थिती देखील तयार होईल. यावेळी मान्सूनही या भागात सक्रिय … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

“भातापेक्षाही ‘या’ शेतीतून शेतकरी अधिक पैसे कमवू शकतात”- नीति आयोग CEO अमिताभ कांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर शेतकरी भाताऐवजी बाजरीची लागवड करतील तर त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, पाण्याचा वापर कमी करण्यासाठी तांदूळ लागवडीऐवजी बाजरीच्या लागवडीकडे वाटचाल करण्याची गरज आहे. अमिताभ कांत म्हणाले की, बाजरीमध्ये पोषक आणि सूक्ष्म पोषक घटक असतात, विशेषत: त्यात प्रथिने आणि कॅल्शियम असतात. … Read more

सचिन पायलटांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अपात्रतेचीच कारवाई २१जुलैपर्यंत टळली

जयपूर । राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला सचिन पायलट समर्थक आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान, सचिन पायलट व इतर सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावलेल्या … Read more

… म्हणून सचिन पायलट समर्थक गटाने ठोठावला आता हायकोर्टाचा दरवाजा

जयपूर । राजस्थानमधील राजकीय नाट्य अजून संपलेले नसून काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट याच्या गटाने आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्षांनी सचिन पायलट गटाला व्हिपचे पालन न केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस अवैध असल्याने ती लागू होत नाही असा दावा करत या नोटिशीला सचिन पायलट गटाने राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले … Read more

भाजपने राजस्थानमध्ये घोडेबाजार केला असून माझ्याकडे त्याचा पुरावा- मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर । राजस्थानमधील काँग्रेस सरकारवरील अस्थिरतेचे संकट कायम असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सचिन पायलट यांनी भाजपा नेत्यांसोबत मिळून राज्य सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री गेहलोत यांनी पुन्हा एकदा भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. Horse trading was being done in Jaipur, we have the proof. … Read more

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट म्हणाले…

जयपूर । राजस्थानात बंडाचा झेंडा फडकवून अशोक गेहलोत यांचं सरकार अडचणीत आणणारे सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या एका वाक्यात सचिन पायलट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. … Read more

राजस्थानमधील राजकीय पेच अजूनही कायम; सचिन पायलट नेतृत्व बदलावर ठाम

जयपूर । राजस्थानमध्ये राजकीय पेच अजूनही कायम आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे. पायलट यांचे समर्थक … Read more

काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more