निसर्गग्रस्तांना NDRFच्या नियमापेक्षा जास्त मदत देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले.चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून वृक्षही कोसळून पडलेत. शेतीच्या नुकसानासोबतच महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळांचे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जास्तीची मदत करणार असल्याचा निर्णय राज्य … Read more

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

विद्यार्थी संघटनांची राज्यपालांकडे भेटीची मागणी; भाजपाच्या प्रत्येक नेत्याला भेटणारे राज्यपाल विद्यार्थ्यांना भेटणार का?

पुणे | राज्यात करोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने शेवटच्या वर्षांच्या परीक्षा सोडून बाकी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात भर टाकून राज्य सरकारने शेवटच्या वर्षाच्याही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत रद्द केल्या. मात्र या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता न देता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील असे सरकारला पत्र लिहून कळविले आहे. … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत. आजपासून … Read more

आता रेस्टोरेंट मध्ये मेन्यू कार्डची गरज नाही; Paytm घेऊन येतेय ‘ही’ खास सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेटीएम या मोबाइल वॉलेट कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे देशातील १० राज्य सरकारांशी कॉन्टॅक्टलेस फूड ऑर्डरसाठी ‘Scan to Order’ QR कोड सिस्टम सुरू करण्यासाठी चर्चा करीत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ते ‘ QR कोड वर आधारित फूड ऑर्डर देण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ बद्दल सरकारशी बोलणी करत आहेत. … Read more

संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत, अशाप्रकारे असतील नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी वाढते आहे. त्याच वेळी, क्रूड ऑइलची किंमतही प्रति बॅरल ४० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर ६०-६० पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान, गेल्या ८० दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला … Read more

राज्य सरकारला ९ हजार कोटींचे कर्ज काढण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात हजर राहणं बंधनकारक, अन्यथा..

मुंबई । राज्य सरकार आता पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाउनकडून राज्य अनलॉक करण्याच्या दिशने पाऊल टाकत आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाजही सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. आठवड्यातून एक दिवसही कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी लागणार आहे. तसा आदेशचं आज राज्य सरकारने … Read more

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more