माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदायला ये नाहीतर घटस्फोट दे म्हणणाऱ्या जावयाला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीस नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे सासरवाडीत जाऊन म्हणणाऱ्या जावयास पत्नीच्या नातेवाईकांकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल आप्पासाहेब कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल कांबळे, रामदास कांबळे, पत्नी दिपाली … Read more

टिकटॉकवरुन भिडे गुरुजींचा आक्षेपार्ह व्हिडीओ, अश्र्लील चित्रफीत व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात टिकटॉक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यासह कारकर्त्यांनी दिले आहे. जर या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर … Read more

मुंबईहून आलेला ट्रकचालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह, सांगलीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मुंबई येथे ट्रकचालक म्हणून काम करणारा एकजण ट्रकमधून इस्लामपूरमध्ये आला होता. त्यानंतर टँकरमधून कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील त्याच्या गावी जात असताना मुंबई येथून आल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. आरोग्य तपासणीमध्ये तो संशयित वाटल्याने ताबडतोब त्याला मिरजेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगलीची … Read more

तहसीलदारांना महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्याकडून मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून तहसील कार्यालय आवारामध्ये विटयाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा विटा तहसील कार्यालयात आवारात तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार … Read more

नगरपालिकेच्या घंटागाडीतून दारू वाहतूक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्हाधिकारी आदेशाचा भंग करून कोरोना बाधित कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या मालकीची सरकारी घंटागाडी वापरून दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव रामचंद्र जाधव याचेसह सतीश बबन मंडले, सुनील सावळाराम जाधव, सागर जाधव व राजभवन बिअर बारचे मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राष्ट्रीय … Read more

जनतेने शांततेने आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे -प्रा. डॉ. एन.डी.पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन डी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानतर्फे कोरोना नियंत्रणासाठी 60 हजार रुपयांचे मास्क आणि दोन लाख रुपयांची मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी … Read more

कोरोनाग्रस्त जिल्हे रेड झोनमध्ये ही साफ खोटी बातमी – विश्वजित कदम

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा काहीसा दिलासा मिळाला असतानाच सरकारने कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार तीन झोनमध्ये विभागणी केली. पंधरापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोन’मध्ये टाकण्यात येणार असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश होणार असल्याची माहिती सर्वत्र पसरताच कोरोना बाधित जिल्हे रेड झोन मध्ये समाविष्ट केल्याचे वृत्त कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी आज … Read more

कोरोनाविरुद्ध लढण्याचा इस्लामपूर पॅटर्न, २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त – जयंत पाटील

सागली प्रतिनिधी | जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ वर पोहोचल्याने सांगलीकर चिंतेत होते. मात्र आता योग्य पावले उचलल्याने सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या सांगली पॅटर्नबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी, तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद … Read more

मिरजेत सामुहीक नमाज पठण केल्याचा धक्कादायक प्रकार, ४१ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकझ प्रकरण ताजे असताना मिरजेतील मटण मार्केट येथे बरकत मशिदीमध्ये सामुहीक नमाज पठण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामुहीक नमाज पठण करणाऱ्या ४१ जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये माजीनगरसेवक साजिद पठाण … Read more

इस्लामपूरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण कशी झाली? घ्या जाणून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात १२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यतल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता अकरा वरून २३ वर पोहोचली आहे. संपूर्ण राज्यात सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वात जास्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. या 12 नव्या रुग्णांमध्ये ६ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश असून त्यांना इन्स्टिट्युशनल कॉरांटाईन मध्ये ठेवण्यात … Read more