टिकटॉकवरुन भिडे गुरुजींचा आक्षेपार्ह व्हिडीओ, अश्र्लील चित्रफीत व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात टिकटॉक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यासह कारकर्त्यांनी दिले आहे. जर या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यावा लगे असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी अविनाशबापू सावंत आणि राहुल पवार उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सोशल मीडियावरील टिकटॉक या अँपवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या विरोधात अश्र्लील व आक्षेपार्ह चित्रफीत बनवून काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी ती व्हायरल केली आहे. अतिशय अश्र्लील भाषेत व किळसवाणे शब्द या व्हिडीओ मध्ये यूजर्स कडून वापरण्यात आले आहेत. सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना अशा प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट तयार करून त्या व्हायरल केल्या आहेत. या पोस्ट व्हायरल करणार्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ निर्माण होत आहे.

त्यामुळे या टिकटॉक अँपवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवप्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात जर कठोर कारवाई झाली नाही तर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते वेळप्रसंगी कायदा हातात घेतील असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिला आहे.

You might also like