राजू शेट्टींनी स्वीकारली शरद पवारांची ऑफर; राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत प्रतिनिधित्व करण्यास होकार कळवला आहे. शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी … Read more

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील … Read more

दलाल, व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली- राजू शेट्टी

सांगली प्रतीनिधी । कांदा निर्यात बंदी सरकारने उठवली या निर्णयाचे स्वागतच करतो, मात्र हा निर्णय एक महिन्याअगोदर घेतला असता तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. केवळ व्यापारी आणि दलालांचा फायदा करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. ते सांगली येथे बोलत होते. राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा … Read more

परभणी जिल्हा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलं काळ्या फिती लावून कामकाज

नियमबाह्य काम आणि आपली मनमानी करण्यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना दादागिरी करत असल्याचा आरोप करत, परभणी कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज निषेध आंदोलन केल आहे. काळ्या फिती बांधून कामकाज चालू ठेवल असल तरी स्वाभिमानीच्या काल झालेल्या आंदोलनाच्या विरोधात. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पीक नुकसानीचे तत्काळ पंचनाम्यांच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, यात रब्बीतील पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आता आक्रमक झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करत आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये सडलेली फळे फेकून आणि खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध आंदोलन … Read more

विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंगाखेड -परभणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन

प्रादेशिक आर्थिक भागीदारीचा करार केंद्र सरकारने स्वीकार करू नये तसेच जिल्ह्यातील खरीप पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावी या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी परभणी गंगाखेड रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ रस्ता रोको केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधत ग्रामीण भारत बंद ची हाक दिली होती .यात स्थानिक संघटनेच्यावतीने परभणीत बुधवार आज ८ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
.

शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.

राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री व्हावं- रविकांत तुपकर

सोलापूरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक आज सोलापूरमध्ये पार पडली त्यात,अनेक कार्यकर्त्यांकडून राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रमुख नेत्याने तसा प्रस्ताव दिला नाही अशी माहिती स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली आहे. अगदी प्रदेश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत सगळीच कार्यकारिणी बरखास्त झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या कार्यकारिणीची बांधणी करणार असल्याचे स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी शेट्टींनी ही माहिती दिली.

शिरढोणमध्ये स्वाभिमानीने ऊसतोडी बंद पाडत रोखली वाहने

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ऊसदराचा तोडगा निघाल्याशिवाय गाळप हंगाम करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देत आज कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणमधील ऊसतोडी बंद पाडल्या. याशिवाय वांगी येथून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची हवा सोडून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरु केले असले तरी अद्याप दराचा तोडगा निघालेला नाही. रविवारी कोल्हापुरात स्वाभिमानी … Read more