खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या

बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नवनीत राणा यांनी या मेळघाटमधील चुर्णी गावातील या बँकेला भेट दिली असता बँकेचा अनागोंदी कारभार पाहून त्यांनी राणा यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.

यात्रेत हरवलेल्या बालकाला पोलीसांनी शोधलं; माय-लेकराची करून दिली भेट

अमरावती जिल्हातील बहीरम येथे दरवर्षी भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रभर नावलौकीक असणार्‍या बहीरम यात्रेवर येथिल पोलीसांची बारीक नजर असून मंगळवारी येथे एका हरवलेल्या बालकाला पोलीसांनी शिताफीने शोधून त्याच्या आईवडलांच्या स्वाधिन केले. यात्रेमधे येणार्‍या यात्रेकरूंनी स्वतःच्या मुलांकडे नेहमी लक्ष ठेवण्याची विनंतीही यावेळी पोलीस प्रशासनाने केली. खरेदी करण्यात मग्न असलेल्या पालकांकडून लहान बालकांकडे दुर्लक्ष केले जाते आणि याचा परिणाम म्हणून मुले हरवतात. मुलं हरवणार नाहीत याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी असा सल्ला पोलीसांनी यावेळी दिला आहे.

धामणगाव रेल्वेमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, अमरावती जिल्ह्यातील सलग दुसरी घटना

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या ६ वर्षीय चिमुकलीला घराबाहेर बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी नागेश कुरील असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर मात्र कामचुकारांची खैर नाही – बच्चू कडू

बच्चू कडू यांना चालू मंत्रिमंडळात बऱ्याच जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जवळपास ४ विभागातील राज्यमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी आलेल्या बच्चू कडू यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

यशोमती ठाकूरांच्या मंत्रिपदाचा मोझरी गावात एकच जल्लोष

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात सलग तीनदा विजयी झालेल्या काँग्रेसच्या आक्रमक फायर ब्रँड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आज विधानभवनात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच त्यांचे गाव असलेल्या तिवसा मतदार संघातील मोझरी गावात त्यांच्या कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला.

अमरावती जिल्ह्यात ८ महिन्यांत कर्करोगाचे तब्बल १०८ रुग्ण आढळले

देशातील आणि राज्यातील दिवसेंदिवस वाढणारे कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेत अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेतील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संशयित कर्करुग्णांची तपासणी करण्यात आली होती.

अमरावती शहरात तरुणाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न, हल्लेखोर आरोपी अटकेत

अमरावती शहरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आनंदनगरात घडली. अभिजित ऊर्फ गोलू अरुण पार्डीकर असे जखमीचे नाव आहे. अरुणवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हल्लेखोर आरोपी शंकर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सराफा दुकानफोडीचा मास्टरमाईंड पोलीसांच्या जाळ्यात; परतवाडा पोलिसांची कारवाई

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका सराफा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात २ महिन्यांनी यश आलं आहे. ६० ते ७० लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ करून पळालेल्या कुख्यात आरोपी पंकजसिंह दुधानी याला परतवाडा पोलीसांनी मुंबईतून अटक केलेली आहे.

अमरावती विद्यापीठात मूल्यांकनासाठी तब्बल ८१० परीक्षक

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात पेंडालमध्ये परीक्षकांकडून मूल्यांकनाची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. काल म्हणजेच शुक्रवारीतब्बल ८१० परीक्षाकांनी उपस्थिती लावली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याने पेंडालदेखील मूल्यांकनास कमी पडला असल्याचे निदर्शनास आले.

‘त्या’ ध्येयवेड्या युवकाची दिल्ली ते कारगील तिरंगा दौड

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली येथील एका २२ वर्षीय तरुणाने भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खांद्यावर तिरंगा घेऊन दिल्ली ते कारगील, अशी दौड लावली आहे. सुमित गौर असं या युवकाचं नाव आहे. ५ डिसेंबरला दिल्लीच्या इंडिया गेटवरून तो कारगीलच्या दिशेने निघाला. १०६८ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करून भारतीय सैन्यदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तो भेटणार आहे.