कार- दुचाकीच्या अपघातात 6 ठार; Innova चा चक्काचूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्ह्यातील परतवाडा- बैतूल मार्गावर दुचाकी आणि इनोव्हा मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या अपघातात इनोव्हाचा चक्काचुर होऊन दुर्दैवाने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूकही काही वेळ विस्कळीत झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरजगाव पोलीस ठाणे येथील रात्रगस्त … Read more

अमरावतीत शिवसेना नेत्यावर गोळीबार; परिसरात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मुंबईत शिवसेना आणि अमरावतीचे राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे वातावरण तापलं असतानाच तिकडे अमरावती मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घरड यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. यामध्ये गरड जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घरड यांच्यावरील हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. … Read more

वातावरण तापलं!!! झेंडा काढण्याच्या कारणावरून 2 गटात राडा; 16 जणांना अटक

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्याच्या कारणावरून 2 गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कलम 144 लागू करण्यात आला आहे. अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या … Read more

हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा अमरावतीचा हवालदार अखेर निलंबित

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – आपल्या युनिफॉर्ममध्ये आणि सरकारी पिस्तुल हातात घेऊन व्हिडिओ तयार करणं, एका हवालदाराला चांगलेच महागात पडले आहे. गुंडांनी दादागिरी करू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न या हवालदारानं केला असला, तरी अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं, हे नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? अमरावती जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक ! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून घरामागेच अत्याचार

Rape

अमरावती : हॅलो महाराष्ट्र- अमरावती जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव हरी उर्फ दिवाकर कराळे असे आहे. पीडित 15 वर्षीय मुलगी रात्री 8 वाजेच्या दरम्यान घराबाहेर निघाली होती. त्यावेळी या … Read more

मेळघाटात पोटावर चटके दिलेल्या चिमुरड्याचा अखेर दुर्दैवी अंत…

Dead

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – ( आशिष गवई)-  मेळघाटातील दोन वर्षीय चिमुरड्याला आजीने ताप आल्यानंतर पोटावर चटके देत अघोरी प्रथेने अंधश्रद्धेचा कळस गाठला होता . त्यानंतर बाळाची तब्येत बिघडल्यामुळे त्याला तडकाफडकी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते . त्यानंतर मेळघाटातील खटकली येथील राजरत्न जामूनकर या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा आजीवर चिखलदरा पोलिसांनी गुन्हे दाखल … Read more

झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताची शंका

murder (1)

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी परिसरातील वनविभागाच्या राखीव जंगलात एका 17 वर्षीय मुलाचा आणि 16 वर्षीय मुलीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हे मृतदेह तीन-चार दिवसांपासून लटकलेले असावेत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हे दोघेजण १३ मेपासून बेपत्ता होती. या दोघांनी … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरने गळफास घेऊन केली आत्महत्या

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमधील बियाणी चौकात राहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अनमोल बाबूराव शहाणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनमोल … Read more

महिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा अमरावतीमधील घटना

Amravati

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा या ठिकाणच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेने चक्क कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतरसुद्धा त्या महिलेने धिंगाणा घातला. दारूच्या नशेत तिने तिला अटक करायला आलेल्या महिला पोलिसावर हात उगारला. या प्रकरणी त्या महिलेवर … Read more