वृत्तपत्राच्या बातमीदारावर ३ जणांचा चाकु हल्ला; मेळघाटातील धारणीमधील घटना

अमरावती जिल्हाच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात गुरुवारी एका वृत्तपत्राच्या बातमीदारावर धारधार चाकूने ३ जणांनी सपासप वार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेख मलिक शेख रहीम असे जखमी झालेल्या बातमीदाराने नाव आहे. शेख रहीम हे धारणी येथून बातम्या लिहिण्याचे काम करतात. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस हल्लेखोरांचा अधिक तपास करत आहेत.

मेळघाटात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील घटांग या गावाच्या हद्दीमध्ये एका २७ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृत महिलेचा गळा ओढणीच्या सहाय्याने आवळून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ऑनलाईन वस्तू मागवणे डॉक्टरला पडले महागात; लिंक फॉलो करताच खात्यातून दिड लाख लंपास

काही मिनिटांतच त्यांच्या बॅंक खात्यामधून एक लाख ४९ हजार ९९७ रुपये एवढी रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती झाली. आपली फसवणूक झाले असल्याचे समजताच याप्रकरणी महिला डॉक्‍टरने सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरॅकल फाउंडेशनचा उपक्रम

दिवसेंदिवस महिला अत्याचार बलात्काराच्या घटना वाढत आहेत.अनेकवेळा एकटेपणाचा फायदा घेऊन मुलींवर अतिप्रसंग येतात. अशा परिस्थितीत मुलींना बाल वयातच स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मिरॅकल हार्ट फाउंडेशन अमरावतीच्यावतीने. मुलींच्या संरक्षणासाठी एक चर्चा सत्र आणि सेल्फ डिफेन्स कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

अमरावतीकरांना रेल्वे आरक्षण मिळेना! आगामी ख्रिसमस,नववर्षाच्या अनुषंगाने बुकिंग फुल

रेल्वेचे बुकिंग फुल झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने रेल्वे गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून ‘नो रूम’ झळकत आहे.

स्वयंरोजगारासाठी दिव्यांग तरुण धडकला थेट अधिकाऱ्यांच्या दारात  

अचलपूर नगरपालिकेमध्ये आज एक दिव्यांग व्यक्तीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कक्षात धडक देत रोजगाराची विचारपूस केली. या दिव्यांग व्यक्तीची स्वयंरोजगारासाठीची धडपड पाहता संबंधित अधिकाऱ्याने या व्यक्तीला मदतीचे आश्वासन दिले आहे. मो.  ईमरान असे या दिव्यांग तरुणाचे नाव आहे.  

खासदार नवनीत राणा पोहचल्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्तांशी साधला संवाद

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशीला जबर फटका बसला. त्यामुळे सोयाबीन सह कपाशी पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सांत्वना व दिलासा देण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या होत्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

अमरावतीत माॅलवरून उडी मारत तरुणीची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट

रुपाली ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. शहरातील बियाणी चौकातील नेक्स्ट लेव्हल मॉल हा लोकांची वर्दळ असणारा मॉल आहे. रुपालीने या मॉलच्या पाचव्या माळ्यावरून रूढी घेतली. यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रुपालीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.पदवी परीक्षेत नापास झाल्याने, आलेल्या नैराश्यामुळं तीने ही आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

अप्पर आदिवासी विभाग कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

अमरावती प्रतिनिधी। आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदिवासी मंत्रालयाकडून आदिवासी विभागाला करोडो रुपयाची तरतूद केली जाते. मात्र आदिवासी विभागाकडून ती रक्कम खर्च केली जात नाही. त्यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्पर आदिवासी विभाग कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले . परिणामी शिल्लक रक्कम सरकारकड परत केली जाते. अमरावती शहरात जवळ पास 8 आदिवासी मूलामुलींची वसतिगृह आहेत. मात्र हे सगळे … Read more