लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं … Read more

औरंगाबादमध्ये पोलीस सप्ताहाचं उद्घाटन, पोलिसांच्या कामगिरीवर प्रकाशझोत

२ जानेवारी हा पोलीस स्थपना दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पोलीस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आज या सप्ताहाचे उद्घाटन पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

थर्टीफस्टने घेतला तरुणांचा बळी! सुसाट बीएमडब्ल्यू विहिरीत पडून २ ठार, तिघे गंभीर जखमी

औरंगाबादकडे येणारी बीएमडब्ल्यू कार विहरीत कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. या घटनेत २ तरुण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. थर्टीफस्टचे सेलिब्रेशन करून भरधाव वेगात औरंगबादकडे येतांना असलेल्या या तरुणांच्या बी.एम.डब्लू कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार विहरीत पडून हा अपघात घडला. सौरभ विजय नंदापुरकर वय २९ (रा रोकडे हनुमान कॉलोनी,) वीरभास कस्तुरे वय ३४(रा पुंडलिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाची नावे आहेत तर नितीन रवींद्र शिशिकर वय-३४, प्रतीक गिरीश कापडिया वय-३०, मधुर प्रवीण जैस्वाल वय-३०अशी जखमींची नावे आहेत.

औरंगाबादमध्ये पाकिस्तानी नागरिकांना सोबत घेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने भव्य रैली आणि सभेच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी शेकडो नागरिक या रैलीत सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान मधून आलेल्या पाच नागरिकांच स्वागत करण्यात आलं.

 लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेचे लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

 शहरातील रेल्वस्टेशन परिसरातील पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लॉजमध्ये नेऊन लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाविरोधात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला. व्यवसायात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे २ लाख रुपये घेऊन फसवणूकही केल्याचेही समोर आले आहे. शेख जुबेर शेख अब्दुल अजीज असे या आरोपीचे नाव आहे.

कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरवणारा अटकेत; पोलिसांची तडकाफडकी कारवाई

औरंगाबाद शहरातील बीड बायपास रोडवरील राजेशनगर आणि यशवंतनगर भागातील कुंटणखान्याच्या दलालांना ग्राहक पुरविण्याचे काम करणाऱ्या एजंटच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मनोज जाधव असे संशयिताचे नाव असून, तो ग्राहकांनाही महिलांचे फोटो पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कुंटणखान्यावर ७ डिसेंबरला छापा टाकून चार दलाल आणि ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

बँकमधील सायरन वाजू लागल्याने मध्यरात्री खळबळ; पोलीस,नगरसेवकांची पळापळ

बँकमधील एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी एटीएम सेंटर मध्ये सायरन लावल्याचे सर्वत्र पाहण्यात येत. मात्र अशा एका सायरनमुळे रात्री सर्वांना कश्या पद्धतीने मनस्ताप होऊ शकतो याचा प्रत्यय सिडको एमआयडीसी च्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आला. एन-१ परिसरातील सिंडीकेट बँकेचा सायरन शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक वाजण्याचा सुरू झाला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सायरनचा आवाज आल्याने स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे, विशाल गंगावणे, गणेश गांगवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे कोणीच नसल्याचे आढळून आले.

औरंगाबाद जिल्ह्यात कांद्याचे भाव उतरले; १०० चा कांदा आला ५० ते ६० रुपयांवर

संपूर्ण देशाच्या बहुतांश भागात यंदा पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच उशिरा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचा सर्वात मोठा परिणाम कांद्याच्या उत्पनावर झाला. घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. राज्याप्रमाणे औरंगाबाद मध्ये देखील कांद्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता काही प्रमाणात कांद्याचे दर झाल्याचे पाहण्यात येत आहे.