बेपत्ता पत्नीच्या शोधात पती हैराण; पोलिसांना काही पत्ता लागेना

शहरातील एका खासगी सुरक्षा रक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांना अजूनही त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी तपासाबाबत काय पावले उचलली आहेत. अशी विचारणा करत १३ डिसेंबरपर्यंत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते.

औरंगाबादमध्ये हायप्रोफाईल कुंटणखान्यांवर गुन्हे शाखेचे छापे, १० जणांना अटक

शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधील एका बंगल्यात आणि रो-हाऊस मध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेला हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांच्या टाकलेल्या धाडीत १० जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वेश्या अड्ड्यावर अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये शहरातील प्रसिद्ध प्रोझोन मॉलच्या मॅनेजरचा समावेश देखील आहे. ही कारवाई बीड बायपास रस्त्यावरील उच्चभ्रू वसाहतीत करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमधील एकनाथ रंगमंदिराच्या दुरावस्थेबाबत प्रशांत दामलेंची नाराजी

मागील दोन वर्षांपासून संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर नाट्यगृहाची प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आज सकाळी पाहणी केली. तब्बल दोन वर्षांनंतरही काम रखडल्याचे पाहून दामले यांनी नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये दामले यांनी औरंगाबाद शहरातील नाट्य कलावंत आणि रसिकांसह नाट्यगृहात झाडलोट केली होती. रंगमंचावरील पडदे शिवून प्रतिकात्मक निषेध देखील नोंदवला होता. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनावर प्रचंड टीका झाली होती. महापौर, पालकमंत्री यांनी तातडीने निधी जाहीर करुन नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू केले.

औरंगाबाद महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले, आता विकास होईल का?

राज्याच्या सत्तासंघर्षात महापालिकेचे काम जवळपास दीड महिना आयुक्तांविना सुरू होते. प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत असले तरी त्यांनी महापालिकेत लक्षच घातले नाही. त्यामुळे विविध वॉर्डांतील विकासकामांबरोबरच पालिकेतील धोरणात्मक कामेही प्रलंबित होती. बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय हे नवीन आयुक्त म्हणून औरंगाबाद महापालिकेला मिळाले आहेत. पुढील आठवड्यात पांडेय पदभार स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवरच नवीन आयुक्त मिळाल्यामुळे आगामी महापालिका निवडणूक समोर ठेवून महापौरांनी रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आता प्रलंबित कामे मार्गी लागण्याचे स्पष्ट झाले आहे.

आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिकने केला तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार

आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात एका महिला लिपिकाने तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे.

वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने सेवानिवृत्तांची परवड, १२ हजार सेवानिवृत्त पेन्शनपासून वंचित

३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे पेन्शन वेळेवर मिळण्याच्या व उर्वरित आयुष्य सुखाने जगण्याच्या अनेक सेवानिवृत्तांच्या इच्छेला कोषागार विभागाच्या ढिम्म कारभारामुळे सुरुंग लागला आहे.  १२ हजार सेवानिवृत्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परवड सुरू आहे. सेवानिवृत्तांच्या वेतन पडताळणी संचिकांचा ढीग कोषागार विभागात पडून असून, ऑनलाईन व संचिका आवकीच्या ज्येष्ठतेनुसारच त्या तपासल्या जात आहेत. शासकीय सेवेची संधी मिळाल्यानंतर जो आनंद कर्मचाऱ्याच्या मनात रुजू होताना असतो, तेवढेच दु:ख आणि वेदना सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येत आहे.

औरंगाबादमध्ये ५ लाखांची खंडणी स्वीकारतांना राजकीय पुढाऱ्याला अटक

शिक्षण संस्था चालकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागून ५ लाख रूपये स्वीकारताना राजकीय पुढाऱ्याला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. हा पुढारी समाजवादी पक्षाचा औरंगाबादचा प्रमुख महासचिव असल्याचं समजत आहे. अमितकुमार सिंग असं पुढाऱ्याच नाव असून या प्रकरणात सहभागी त्याच्या साथीदारांदेखील पोलिसांनी अटक केली गेली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंग याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर अली आहे.

महिलांच्या मनातील भयमुक्त वातावरणासाठी निर्णय घ्या! औरंगाबादमधील तरुणाईचे पंतप्रधानांना पत्र

हैद्राबाद बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील अटकेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून समोर येत आहे. यावर आता शहरातील तरुणाईने सुद्धा कणखर भूमिका घेत देशातील महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात यावे. अशा मागणीचे पत्र विद्यार्थ्यांनी थेट प्रधानमंत्र्यांना लिहिले आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, आम्ही तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असेही म्हटले आहे. हे पत्र तरुणांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले आहे. हे पत्र सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे.

औरंगाबाद शहरात भरवस्तीत आढळला बिबट्या, वन विभागाकडून शोधाशोध सुरू

शहरातील एन-वन परिसरामध्ये आज पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला फिरताना पाहून सर्वच हादरुन गेले. एन-वन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील नागरिकांनी तात्काळ वनविभाग आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली आहे. पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काळ गणपती मंदिरा मागील गार्डनमध्ये सकाळी ९ पर्यंत युद्ध पातळीवर बिबट्याचा शोध सुरू केला जात होता.

कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह आढळला, बलात्कार करून खून केल्याचा संशय

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणाऱ्या आठेगाव येथे १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे अजून स्पष्ट झालं नाही.