पक्षात परतण्यासाठी काँग्रेसने सचिन पायलट यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली । सचिन पायलट यांचे बंड मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसने मोडून काढल्यानंतर पक्षानं पुन्हा एकदा परत येण्याची त्यांना विनंती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. सुरजेवाला म्हणाले की, “आमचे युवा सहकारी सचिन पायलट यांची भूमिका आम्ही माध्यमांतून … Read more

सचिन पायलट यांना पक्षातून काढा! काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मागणी

जयपूर । मागील २ दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय सत्तानाट्य सुरू आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट राज्यात नैतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. मात्र, सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, आता जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस … Read more

सिंधिया च्या लोकांना ‘अमृत’ वर भाजपा मध्ये बगावत, पूर्व मंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ११ दिवसांनंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी आपल्या मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट वाटपात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लोकांकडे खास लक्ष दिले आहे. कॅबिनेट मध्ये जागा न मिळाल्यामुळे काही लोक आधीपासूनच नाराज होते. खातेवाटपानंतर आमदार आणि माजी मंत्री अजय विश्नोई यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. त्यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. ते भाजपाचे वरिष्ठ नेते … Read more

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप..!! सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल; भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार?

अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

राजीव गांधी फाऊंडेशन चौकशी प्रकरण; मोदीजी काहीही करा पण आम्ही घाबरणार नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली । राजीव गांधी फाऊंडेशनसह नेहरु-गांधी कुटुंबीयांशी संबधित ३ ट्रस्टच्या चौकशीसाठी मोदी सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबीयांशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या ३ संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. या फाउंडेशनच्या 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या आर्थिक मदतीबाबत चौकशी केली जाणार … Read more

मी कुणी महाराजा नाही, कुणी वाघ नाही, मी कधीच चहा विकला नाही, मी कमलनाथ आहे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ आज पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपामध्ये प्रवेश घेतलेल्या जोतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला आहे. ते यावेळी, ‘मी कुणी महाराजा नाही, मी वाघ नाही, मी मामा नाही, मी कधीच चहा विकला नाही, मी कमलनाथ आहे. मध्यप्रदेशची जनता ठरवेल कोण … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

पेट्रोल डिझेल दरवाढीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केला गंमतीशीर व्हिडीओ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात देशातील पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला टोला मारला आहे. काँग्रेसच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवर केलेले भाष्य या व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, दिवंगत अरुण जेटली यांचीही विधाने आहेत. तसेच पेट्रोलचे … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल ‘ईडी’ चौकशीच्या फेऱ्यात; ३ अधिकाऱ्यांचे पथक धडकले घरी

नवी दिल्ली । काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेल सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) फेऱ्यात आले आहेत. संदेसरा समूहाच्या ५ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी ईडीचे पथक अचानक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ‘ईडी’च्या ३ अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल … Read more