Sunday, March 26, 2023

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर टीका केली.

“महाराष्ट्र सरकार म्हणतं, सोशल मीडियावरून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या, सरकारचा विरोध करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू. यावरून काँग्रेसची जी संस्कृती आणीबाणीच्या काळात दिसली, तशीच संस्कृती महाराष्ट्रातील जनतेला आता दिसतेय,” असं स्मृती इराणी म्हणाल्या. स्मृती इराणी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीही पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली.

- Advertisement -

“महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. कोरोनाच्या लढाईत आणि खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरच मालक आहे,” असं फडणवीस म्हणाले. या विधानावर अद्याप महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सरकार याला काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.