पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मदत म्हणून दिले जातात.हे पसे २-२ हजार करून दार तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.देशातले लाखो शेतकरी या योजनेचा लाभ उचलत आहेत.कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने घोषणा केली आहे कि पुढची रक्कम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.सरकारने सांगितले आहे ८ करोड … Read more

केंद्र सरकारनं मास्क, सॅनिटायजरच्या किंमती केल्या निश्चित; काळेबाजारामुळं घेतला निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. करोनापासून बचाव व्हावा म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायजर विकत घेण्यासाठी मेडीकल दुकानांवर नागरिक गर्दी करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी दुकानदार मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजर करत असल्याचं समोर आलं होतं. … Read more

Big Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला ‘जनता कर्फ्यू’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इथून पुढचा काही काळ आपण सामाजिक अंतर ठेवून वागणच हितकारक आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विज्ञानाला अजूनही ठोस उपाय सापडला नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा वेळ सुजाण भारतीय नागरिक म्हणून मला द्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांनाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना … Read more

केंद्राने केली EPF व्याजदरात कपात, कर्मचारी वर्ग कोमात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात केली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ०.१५ टक्के कपात करून ८.५०% व्याजदर घोषीत केला आहे. संघटनेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा न मिळाल्याने यंदा व्याजदरात कपात केल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं जवळपास ६ कोटी कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसणार … Read more

कोल्हापूर भाजपच्या वतीने नागरिकता संशोधन कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर समाजामध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही कट्टर धर्मवादी लोक मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवत असल्याने सर्वसामान्य लोकांना कायद्याची योग्य माहिती व्हावी, याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यामुळे देशभर विनाकारण निर्माण झालेली अस्वस्थता संपावी या हेतूने या कायद्यासंदर्भात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम घेण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापक … Read more

शाहीन बाग: ४ महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाने घेतली दखल;केंद्र आणि दिल्ली सरकारला विचारला जाब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीमधील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) सुरु असलेल्या आंदोलनात ४ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूची दखल सुप्रीम कोर्टाने सोमवारी घेतली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ४ महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणाची दखल घेतल्याबद्दल काही वकिलांच्या आक्षेपावर कठोर भूमिका घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांचं मूल आंदोलनात … Read more

निर्भयाच्या आईचा आक्रोश; म्हणाली ‘हा अन्याय आहे, कोर्ट आरोपींना आणखी किती वेळ देणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्र सरकारच्या वतीनं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकणातील चौघा नराधमांना फाशी देण्याची तारीख द्यावी अशी याचिका दाखल केली आहे. आज याचिकेवर सुनावणी करताना आरोपींना जोपर्यंत जगण्याचा अधिकार आहे तो पर्यंत जगू द्यावं असं सांगत न्यायालयाने फाशीची तारीख देण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे आजही या नराधमांना फाशी कधी होणार … Read more

केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ठप्प पडलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने या घोषणेकडे पहिले जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ओढले ताशेरे; काश्मीरमध्ये इंटरनेट बंदी आणणं जाचक

सर्वोच्च न्यायालयात काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल निर्बंधाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी आज पार पडली. न्यायमूर्ती एन व्ही रमणा, आर सुभाष रेड्डी आणि बी आर गवई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने काश्मीरमधील निर्बंधांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर गतवर्षी २७ नोव्हेंबरला सुनावणी पूर्ण केली होती त्यावर आज निकाल देण्यात आला.

विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंगाखेड -परभणी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन

प्रादेशिक आर्थिक भागीदारीचा करार केंद्र सरकारने स्वीकार करू नये तसेच जिल्ह्यातील खरीप पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावी या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी परभणी गंगाखेड रस्त्यावरील जुन्या टोलनाक्याजवळ रस्ता रोको केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील शेतकरी संघटनांची मोट बांधत ग्रामीण भारत बंद ची हाक दिली होती .यात स्थानिक संघटनेच्यावतीने परभणीत बुधवार आज ८ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
.