सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर … Read more

मुंबई, दिल्ली पेक्षा ‘या’ शहरात कोरोनाचा मृत्यू दर सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली आणि मुंबई हे भारतातील कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेली राज्ये आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी २० टक्के प्रकरणे ही एकट्या मुंबईतून समोर आली आहेत. पण भारतातील दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडले आहे. इतकेच नाही तर अहमदाबादमध्येही शंभर कोरोना प्रकरणातील सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण (सीएफआर) … Read more

पुणे जिल्ह्यात दिवसभरात १७६ रुग्ण

पुणे । पुणे जिल्ह्यात आज दिवसभरत १७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात एकूण ७ हजार २६५ इतकी रुग्णसंख्या झाली आहे. ही माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिळून इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय राबविले जात … Read more

पुण्यात येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठी पासची गरज? पहा काय म्हणतायत पुणे पोलीस

पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

लॉकडाऊन इम्पॅक्ट | पुण्यातील अपंग रिक्षाचालकाच्या संघर्षाला हवाय मदतीचा हात

पुण्यातील दिव्यांग रिक्षाचालक संजय राजू काळे यांना लॉकडाऊन काळात वाढलेल्या अडचणींमुळे तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

Unlock 1.0 | पुणे शहरात काय सुरु राहणार? काय बंद राहणार? 

पुणे । देशात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात संचारबंदीचे बरचसे नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने  होणार आहेत. पुणे शहर हे  देशातील १३ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी असल्यामुळे येथील कंटेनमेंट झोनमध्ये काटेकोरपणे संचारबंदीचे पालन केले जाणार असले तरी इतर परिसरात संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यांच्याबरोबर काही … Read more

शाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज? घ्या जाणून..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत शासनाने राज्य शिक्षक परिषदेकडे काही सूचना मागितल्या होत्या. त्यानुसार परिषदेने नियोजन प्रारूप आराखडा सादर केला आहे. अशी माहिती या परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी दिली आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी … Read more

शाळा सुरु कधी होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

पुणे विद्यापीठ चौकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय 

पुणे । पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल पाडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच इथे एक दुमजली पूल देखील बांधण्यात येणार आहे. शासनाने हे पूल उभारण्यासाठी टाटा- सिमेन्स कंपन्यांसोबत करार करण्याचीही परवानगी दिली आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणास (पीएमआरडीए) मिळालेल्या या पर्वांगीमुळे लवकरच हे पूल पाडण्यात येतील हे स्पष्ट झाले … Read more