मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा ते स्वगृही परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने आता राष्ट्रवादीसमोर घोडा यांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार … Read more

परभणी जिल्ह्यात ‘युती’ पाठोपाठ ‘आघाडी’ला देखील बंडखोरीची लागण

परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपा ‘युती’ला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. युतीच्या बंडखोरांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आता याच बंडखोरीची लागण ‘आघाडी’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला देखील लागलेली दिसत आहे. परभणी विधानसभेसाठी रविराज देशमुख यांचे नाव घोषित झाल्यानंतर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सुरेश नागरे यांनी आता बंडाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून परभणी … Read more

‘वणी विधानसभा’ क्षेत्रात सप्तरंगी लढत; दिगग्ज नेते ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक रिंगणात

यवतमाळ प्रतिनिधी। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. वणी विधानसभा जागेकरिता दिग्गजांसोबत बंडखोरांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता वणी विधानसभा मतदार संघात सप्तरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातील एकूणच चित्र पाहत, उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेल्या काही राजकीय नेत्यांनी अपक्ष का होईना पण आपला हट्ट … Read more

शरद म्हणतात,’अभी तो मैं जवान हूँ ‘

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाची शैली सर्वश्रुत आहे. याचीच प्रचिती काल आली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या त्यांच्या सभेमध्ये. काही दिवसांपूर्वी एका पत्रकारावर रागावलेले पवार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये पवारांनी अशी दोन वक्तव्य केली की … Read more

संजय दीना पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणुक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सत्र कायम रहिले. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. निवडणुक जाहीर होण्याआधी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर, रश्मी बागल, जयदत्त क्षीरसागर अशा नेत्यांनी खांद्यावर भगवा … Read more

‘या’ १८ आमदारांना भाजपनेच नाकारले; पक्षांतर्गत विरोधक कमी करण्यात फडणवीसांना यश

मुंबई प्रतिनिधी | २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात भाजपकडून तब्बल १८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यातील अनेकजण हे १० वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षामध्ये सक्रिय राहिले आहेत. निष्ठवंतांना डावलून आयारामांना किंवा डावलण्यात आलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तिकिट देण्यात आले आहे. नाराज विद्यमान आमदारांपैकी काही जणांनी बंडखोरी केली असून काहींनी पक्षनिष्ठ राहण्यावरच भर … Read more

जागावाटपात ‘स्वाभिमानी’ला ५ जागा, शिरोळमधून राजू शेट्टी की सावकार मादनाईक?

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसह राज्यातील पाच जागा मिळाल्या आहेत. यामुळे इच्छुकांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. शिरोळ मधून सावकर मादनाईकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांचा दबाव वाढला तर ऐन वेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची … Read more

खडसेंचे समर्थक असल्यामुळे भाजप आमदाराला तिकीट नाकारलं..!!

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक जस जश्या जवळ येत आहेत तसे नेत्यांचे राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरदार सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपाकडून उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झाल्या आहेत. जाहीर झालेल्या यादीत आपले नाव नसल्यामुळे बहुतेकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे शहादा विधानसभेचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी या गोष्टीला अपवाद राहिले नाही … Read more