कार्यकर्त्यासारखा झटणारा फक्त एकच ‘सत्यजित’ – धैर्यशील माने

‘दिवसातले २४ तास घरचा तसेच कोणताही विचार न करता उपलब्ध असणारा तसेच २८८ पैकी एवढा झटणारा आमदार जर कोण असेल तर तो सत्यजित पाटील आहे’ असे वक्तव्य हातकणंगले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.

शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? हा खरा प्रश्न आहे – शरद पवार

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या निवडणूक प्रचारातील ३७० च्या मुद्द्यावर टीका केली. देशात कलम ३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे सांगत पवार यांनी आपले मत जाहीर सभेत प्रकट केले.

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार, ५० कार्यकर्त्यांनी ठोकला पक्षाला रामराम

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार की नाही या संदर्भात अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, पण अखेर युती झाली. पुढे तिकीट वाटपातही आयारामांना झुकत माप देत निष्ठावंताना डावलण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या त्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजीतून मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना डहाणू तालुक्यात ५० प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हा ऐन मतदानापूर्वी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे शिवेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे.

‘चला हवा येउ द्या’ फेम भारत गणेशपुरे निवडणूक प्रचार मैदानात

बडनेरा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रिती बंड यांना विजयी करण्याचे आवाहन करण्याकरिता मराठी विनोदी अभिनेते “चला हवा येउ द्या ” फेम भारत गणेशपुरे पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळालेत. रविवारी सकाळी अमरावती शहरातील साई नगर, गोपाळ नगर, गणेश कॉलनी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांसह बंड यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेमधे मराठी सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी सहभागी होऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत प्रीतीताई बंड यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

आघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले आहे. ‘येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त ४० जागा असतील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही त्यांना मिळणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

काश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार

पुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर आज राज ठाकरेंची सभा आज पुण्यात होत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने भाजपने बालाकोट मुद्दा उपस्थित केला होता, त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. लडाखमधील जामयंग त्सेरिंग नामग्याल या खासदाराला सोबत घेत भाजपच्या वतीने पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

अंबरनाथमधील बंड शमले; राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसला पाठिंबा

अंबरनाथ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला समर्थन जाहीर केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. दोन्ही पक्षाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा टाकण्यात आला.

मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..

लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजू शकणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.