कहर!! आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसंहितेचा पालन व्हावं यासाठी आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी सह्जरित्या करण्यासाठी ‘सी व्हिजील’ हे अँप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलं आहे. या अँपवर गुरुवारपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी घेणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचारात उडी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. ते महाराष्ट्रात दोन दिवस प्रचार करणार आहेत. राहुल गांधी नुकतेच कंबोडिया दौरयावरून मायदेशी परतले आहेत. राहुल गांधी हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असून आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकदीनीशी लढवू असं मत काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी व्यक्त केलं.

गोपीनाथ मुंडेना पाडणारा ८२ वर्षांचा कार्यकर्ता संभाळतोय धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा..!!

परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा आहात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड यांची परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे. १९८५ साली परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे याना ३५०० एवढ्या मताधिक्याने पराभूत करून विजय खेचून आणला होता. त्यावेळी महाराष्ट्रातही याच निवडणुकीची चर्चा झाली होती. तेच पंडितराव दौंड आज धनंजय मुंडेच्या सोबत लढत आहेत.

पतंगराव कदमांचे जावई संघाच्या शाखेत? लाड यांचा फोटो व्हायरल

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोधळे काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे जावई काँग्रेसचे कार्यकर्ते महेंद्र लाड यांचा संघाच्या शाखेतील फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतंगराव कदम यांच्या जावयांना संघाच्या शाखेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पलूस शाखेच्यावतीने दसरा संचालन आज संपूर्ण … Read more

प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगांत घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही – आडम मास्तर

सोलापूर प्रतिनिधी | राज्याभर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. असाच एका प्रचार सभेत कामगार नेते आडम मास्तर यांची जीभ घसरली आहे. प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सर्व राजकारण्यांची संपत्ती वाढली मात्र आडम मास्तरवर गुन्हे वाढले असं वर्तमान पत्रात आलं होतं. माझ्यावर आत्तापर्यंत १६५ गुन्हे दाखल आहेत. आणि गुन्ह्यांची डबल सेंच्यूरी मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आपल्यावरील गुन्हे हे आपल्यासाठी अलंकार असल्याचं म्हटलं आहे.

माझ्यावर इतके गुन्हे नोंद असून मी भित नाही. मी परवानगी नसताना सत्याग्रह केले, आंदोलनं कली, मोर्चे काढले. हे सगळं लोकांसाठी केलं असं सागत काही जणांवर नुसते पाच गुन्हे नोंद काय झाले तर ते थरथर कापायला लागतात असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

 

सांगली मतदारसंघात सेना बंडखोर भाजप उमेदवाराला जेरीस आणणार का?

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्यात आता थेट लढत होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर शेखर माने मैदानात असल्याने भाजपच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक यंत्रणा मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. यासाठी मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन लोकांना मतदान करण्याच आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

सोलापुरात राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादी !

सोलापूर प्रतिनिधी | काल सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सोलापूर जिल्हयात मात्र राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादी असल्याचे समोर आले आहे. चक्क राष्ट्रवादीनेच जाहीर केलेल्या दोन उमेदवारांच्या विरोधात पक्षाने भूमिका घेतली आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. करमाळा येथे राष्ट्रवादीने संजय पाटील यांना तर … Read more

बंडखोर भाजप आमदाराने काढली आक्रोश रॅली, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा केला आरोप

उदगीर विधानसभा मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या आमदार भालेराव यांचा पत्ता भाजपनं कापल्यानंतर चिडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच आपले अस्तित्व नमूद करण्यासाठी पहिल्यांदाच भालेरावांनी उदगीर शहरात आक्रोश रॅली काढत आपलं आव्हान कायम असल्याचं सांगितलं.

मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.