राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

पाठिंबा देण्याच्या पत्रावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला आहे. काल शिवसेनेला सत्तास्थापनेचे पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीने वेळेत दिले नसल्याने सेना सत्ताखेळात तोंडघशी पडली होती. दरम्यान राज्यपाल कोशियारी यांनी राष्ट्रवादीला आता सत्तास्थापनेची संधी दिली. मात्र आता सत्तास्थापन पाठिंब्याच्या पत्रावरून काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत

आता रश्मी बागल यांचं पुढं काय ?

करमाळा प्रतिनिधी | राष्ट्रवादीशी बंडखोरी करत, शिवसेनेत रश्मी बागल यांनी प्रवेश केला.बागलांच्या प्रवेशामुळे नारायण पाटील यांचे तिकीट सेनेने कट केले होते. बागलांचा विजय सेनेच्या तिकिटावर येईल असा विश्वास होता. मात्र अपक्ष संजय शिंदे यांनी त्यांचा तब्बल २५ हजार मताधिक्याने पराभव केला. तर नारायण पाटील यांनी शिंदेंना चांगलीच टफ दिली, खेचा खेचीच्या निकालानंतर शिंदे विजयी झाले. … Read more

‘हम होंगे कामयाब…’  संजय राऊतांचे हॉस्पिटल मधून ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटलेली नाही असा विश्वास व्यक्त केला. संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं … Read more

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास.. पक्षांतर केलेले घरवापसी करणार का?

राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला असताना शिवसेनेची शिकार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा आपला मार्ग मोकळा केला आहे. ताज्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास दिले आहेत. अशी माहहती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली.

अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच! काँग्रेसच्या पाठिंब्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार

राज्यात सत्तास्थापनेचा शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला असून. काँग्रेसनं शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांचा समावेश आहे. तेव्हा राज्यात स्थापन होणार नवं सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असणार याबाबत शिक्कामोर्तब आता झाला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांचं महादेवास साकडं

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी आज कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात शिवसैनिकांनी मंत्रौचार करत महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला. यावेळी उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अस साकडं घातले. शिवसैनिकांनी महादेवाला घातलं. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

येऊ द्या ना घरी; भाजपच्या ७ आमदारांचा अजित पवारांना फोन

मुंबई प्रतिनिधी | भाजपने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यानंतर राजकीय चक्रे वेगवान करत शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे भाजपमधील आमदारांच्या गोटात खळबळ सुरु झाली असून भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण … Read more