पश्चिम महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा , इस्लामपूरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता नऊ वर जाऊन पोहोचली आहे. इस्लामपूर येथील चार कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी ५ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ४ वरून ९ झाली आहे. एकाच कुटुंबातील ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याने … Read more

परप्रांतीय घरफोड्यांना नागरिकांनी थरारक पाठलाग करून पकडले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळ दोघे परप्रांतीय घरफोडी करून पलायन करीत असता स्थायिक नागरिकांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. किरण मनोहर भवर ( वय 25 ) आणि मेहरसिंग रामसिंग गुंदड ( वय 24 दोघे रा. खनिंबा ता. कुक्षी जिल्हा धार ) अशी या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात … Read more

सांगलीतल्या मार्केट यार्डात २० कोटींची उलाढाल ठप्प

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे करोना प्रसार वाढू नये, याची खबरदारी म्हणून प्रशासनाने मार्केट यार्डातील सौदेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला असून सुमारे २० कोटीची व्यवहार ठप्प झाले. हळदीचे सौदे पूर्णपणे बंद राहीले. गुळाचे सौदे मात्र काही प्रमाणात खाजगी पातळीवर झाल्याची चर्चा असून गुळाचे सुमारे पन्नास टक्के सौदे झाल्याचे सांगण्यात येत … Read more

कोरोनोच्या दक्षतेसाठी सांगलीत आजपासून मद्यविक्री बंद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकानं आणि परमीट रुम बार तसेच ताडी विक्रीची शुक्रवारपासून ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने गुरुवारी घेतला. जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये गर्दी होवू नये, यासाठी दररोज ५० टक्के व्यापारपेठा बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाचा एकही … Read more

मिरजेत येत्या १५ दिवसात कोरोना टेस्ट लॅब सुरु होणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणतेही करोनाचे रूग्ण आढळले नाहीत. नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मिरेजतील शासकीय रूग्णालयात करोना रूग्णांसाठी अत्याधुनिक स्वॅप लॅब सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच तो मंजूर होईल. सॅनेटायझर व मास्कचा साठा करून टंचाई निर्माण करणार्‍यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री … Read more

कोरोनामुळे सांगली महापालिकेची क्रीडांगणे बंद, स्थायीची सभा रद्द

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मॉल्स, चित्रपटगृहांच्यानंतर उद्याने कुलुपबंद झाली होती. आता आज पासून महापालिकेच्या क्रीडांगणेही बंद करण्यात आली आहेत. तर गुरुवारी होणारी स्थायी समितीची सभा आयुक्त नितीन कापडणीस यांनी रद्द केली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सतर्क आहे. महापालिकेने क्वारंटाईन कक्षही सुरू केला आहे. तसेच जवळपास शंभर खाटांचे आयसोलेशन कक्षही … Read more

उघड्यावर फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महापालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता उघड्यावर फळ विक्री करणाऱ्या तसेच अन्न शिजवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या आरोग्य आणि अतिक्रमण विभागाने मध्यवर्ती बस स्थानकासमोर उघड्यावर अन्नपदार्थ तयार करणाऱ्या तसेच फळे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. यामध्ये अस्वच्छतेच्या कारणावरून तीन हातगाड्या पथकाने ताब्यात घेतल्या. सांगलीच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर मोठ्या … Read more

रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल हॉटेलला ५० हजाराचा दंड,सांगली महापालिकेची कारवाई

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रातील हॉटेल तपासणीला सुरवात झाली आहे. अस्वछता दिसल्यास संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी हॉटेल लक्ष्मीच्या चालकाला महापालिकेच्या पथकाने ५० हजाराचा दंड केला. महापालिका क्षेत्रात अनेक छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये स्वच्छतेबाबत योग्य ती काळजी घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी … Read more

मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला कामगाराने घातला ५ लाखांचा गंडा

Sangli Market Yard.

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे नेमिनाथनगर येथील अरहंत ड्रेडर्स मधील एका कामगाराने व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली ५ लाख ९ हजार रुपयांची रक्कम स्परस्पर लांपास करून गंडा घातल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार विशाल काटे यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी राहत मुश्रीफ याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल काटे … Read more

सांगली-मिरजेचे गणपती मंदिर,आणि तुंगचे हनुमान मंदिर बंद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील गणपती मंदिर, मिरजेतील गणपती मंदिर आणि तुंगचे हनुमान मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित व्यवस्थापनांनी घेतला आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत ही दोन्ही मंदिरे भक्तांची गर्दी टाळण्यासाठी बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृहे, नाट्यगृहे, मॉल आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे … Read more