Sunday, February 5, 2023

मिरजेत येत्या १५ दिवसात कोरोना टेस्ट लॅब सुरु होणार

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणतेही करोनाचे रूग्ण आढळले नाहीत. नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मिरेजतील शासकीय रूग्णालयात करोना रूग्णांसाठी अत्याधुनिक स्वॅप लॅब सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच तो मंजूर होईल. सॅनेटायझर व मास्कचा साठा करून टंचाई निर्माण करणार्‍यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. मिरज शासकीय वैद्यकीय रूग्णालयास व महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलताना राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, मिरज शासकीय रूग्णालय लवकरच कोरोना रूग्णांसाठी अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात येणार आहे. राज्यामध्ये ४१ रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यातील ४० जणांची प्रकृती चांगली आहे. नागरीकांनी गर्दी व समारंभ, प्रवास टाळावा. तेपुढे म्हणाले, राज्यात सॅनीटायझर व मॉस्कचा साठा करूून तुटवडा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी काही अडचणी असतील तर त्या तात्काळ दूर केल्या जातील.

तसेच अवैधरित्या सॅनिटायझर उत्पादन करणार्‍यावर तात्काळ कारवाई करण्यात आले आहे. अशा पध्दतीने कोणी सॅनिटायझरचे उत्पादन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. जिल्ह्यातील कुठेही कुरोना बाधीत रूग्ण आढळून आला नाही. प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय पथके चोवीस तास तैनात करण्यात आली असल्याची माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील  ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

मोठी बातमी! तब्बल ४५१ भारतीयांना झाली आहे कोरोनाची लागण, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग