अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा, शिवसेना नेत्याचे स्पष्टीकरण

औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी … Read more

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं … Read more

मराठवाड्याच्या वाट्याला आली ६ मंत्रिपद, मंत्रीपदी यांची लागली वर्णी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपद आली आहेत. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यातील काँग्रेसकडून मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून मराठवाड्यातून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे याना संधी देत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केलं. तसेच राष्ट्रवाडीकडून राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मराठवाड्यातील दुसरे मंत्री ठरले.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मधून शिवसेनेची उमेदवारी जाहीर

औरंगाबाद प्रतिनिधी | सिल्लोड मतदारसंघातुन माजी आमदार तथा काँग्रेस चे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांना शिनसेनेने उमेंदवारी दिली असुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंनी सत्तार यांना ‘एबी’ फॉर्म दिलाय. त्यामुळ सिल्लोड मधून सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं समजत आहे. पुर्वी भाजपा शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपाकडे होती. काँग्रेस सोडून माजी मंत्री तथा आ.अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत … Read more

काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच आता अब्दुल सत्तार यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसापासून अब्दुल सत्ता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येत असतानाच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला नक्कीच धक्का बसला असणार हे मात्र निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार … Read more

काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा

Untitled design

काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांची फसवणूक केली अब्दुल सत्तार यांचा घणाघात औरंगाबाद  प्रतिनिधी | काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा दिलाय. आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी आपला हर्षवर्धन पाटील यांना पाठींबा असल्याचं जाहीर केलं. यावेळी मी पाटील यांच्यासाठी मागील १३ महिन्यांपासून … Read more