कराड बाजार भाव : हिरवा वाटाणा आणखी महागला

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 6 ऑक्टोंबर रोजी वाटाणा, पावटा व शेवगा तेजीत आला आहे. (कराड बाजार भाव) तर हिरवा वाटाण्याची थोडीसी आवक वाढूनही महागला आहे. वाटाणा 100 ते 150 रूपये प्रति किलो दराने आला आहे. पावटा 70 ते 80 रूपये प्रतिकिलो दर असून शेवगा 70 ते 90 रूपयांनी मार्केटमध्ये विकण्यास आला … Read more

लंपी रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे चेकचे वाटप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा नियोजन अधिकारी … Read more

लंम्पी त्वचारोगाने 4 लाखाच्या शर्यतीच्या बैलाचा मृत्यू

सातारा | फलटण तालुक्यातील जिंती गावातील योगेश वाघमारे यांचा चार लाखांच्या शर्यतीचा भारत नावाच्या बैलाचा लम्पी रोगाने मृत्यू झाला आहे. जिंती गावामध्ये लम्पी आजाराने दुसरा मृत्यू झाला असून, आठ दिवसांपूर्वी एका गायीचा मृत्यू झाला होता. लम्पी रोगाने गावामध्ये शिरकाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिंतील येथील वाघमारे कुटुंबामध्ये आवड म्हणून शर्यतीचा बैल सांभाळत … Read more

कृषि पणनमंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत निवडीसाठी अर्ज करा : शेवटची तारीख 10 ऑक्टोंबर

सातारा | मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक संस्था, मा.वि.म. स्थापित लोकसंचलित साधन केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, उत्पादकांच्या सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रिगेटर, मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था महाराष्ट्र राज्य कृषि पणनमंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 10 ऑक्टोंबरपर्यंत संस्थांनी अर्ज करावेत. राज्यातून … Read more

व्यापाऱ्यांनो सावधान ! शेतीमालाचे नवे- जुने वर्गीकरण करू नका, अन्यथा लायसन्स रद्द होईल

Satara Bazar Market

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके यावर्षी आले व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचे आले खरेदी करताना नवे- जुने असे भाग पाडले जाऊन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याबाबत भारतीय किसान संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सातारा शेती उत्पन्न बाजार समितीकडे मागणी केली आहे. त्यास अनुसरून बाजार समितीने आले व्यापाऱ्यांनी नवे- जुने आल्याचा वर्गीकरण दराचा पाडलेला भाग थांबवावा. अन्यथा आपली व्यापारी … Read more

डाळभात महागला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पहा किती झाली वाढ ?

Turdali Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. कारण पेट्रोल, डिझेल, वीज, भाजीपाल्या पाठोपाठ आता डाळी आणि कडधान्यांच्या किंमती ही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जेवणासाठी साधा वरणभात करायचा का?असा प्रश्न आता गृहिणींना पडू लागला आहे. या दरवाढीमुळेस्वयंपाक घरातील बजेट मात्र कोलमडून जाणार आहे. हंगामाच्या शेवटी … Read more

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर भारतात लवकरच लॉन्च होणार; ‘या’ कंपनीची घोषणा

tractor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत अनेक इलेकट्रीक गाड्या आल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेकट्रीक वाहनांना ग्राहकांची पसंती देखील मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुढील वर्षी भारतात इलेकट्रीक ट्रॅक्टरही लॉंच होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) कंपनीने पुढील वर्षी मार्चपर्यंत भारतात इलेकट्रीक ट्रॅक्टर सहित 10 हजाराहून … Read more

वनविभाग शेतकऱ्यांना म्हणते, प्राण्यांचा बंदोबस्तही नाही अन् भरपाई नाही

पाटण | मणदुरे (ता. पाटण) येथे रानगव्यांनी हाैदाैस मांडला आहे. पावसाळ्यात पाटण तालुक्यात भात शेतीचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, रान गव्यांनी 60 ते 70 एकरातील भात पिकांचे तरूचे नुकसान केले आहे. अशावेळी वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्तही करू शकत नाही आणि पिकांचे नुकसानही देणार नाही असे, सांगत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाटण तालुक्यात पावसाचे … Read more

बनावट बियाणे आढळल्यास कंपन्यांवर फाैजदारी गुन्हे दाखल करा : दादा भुसे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात बनावट बियाण्यांचा प्रकार निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. सातारा जिल्हा दौऱ्यावर कृषी मंत्री दादा भुसे आले असून त्यांनी सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी खरीप हंगामाबाबत … Read more

सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटनेचे जुलैमध्ये धरणे आंदोलन : रघुनाथदादा पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सहकारी बँका अणि पतसंस्था शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे व्याज अकारणी करून कर्ज वसूल करत आहेत. त्याच्यावर कारवाई होत नाही. या मुद्यासह शेतकरी आत्महत्या प्रश्नी सहकार मंत्र्याच्या घरावर शेतकरी संघटना जुलैमध्ये धरणे आंदोलने करणार आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकरी संघटनेची … Read more