…त्या आईनेच केला होता चिमुरडीचा खुन; मयत आईवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या घटनेच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

अहमदनगर : विहिरीत उडी मारून चिमुरडीसह आईची आत्महत्या …

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे मायलेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई ने मुलीला सोबत घेऊन आत्महत्या का केली ? यामागचे कारणं अद्याप समजू शकले नाही . नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27) रा. धनगरवाडी तालुका नगर, व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला .

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘युती’ला ‘टफ फाईट’; ७ जागांवर आघाडी

पहिल्या फेरीत जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. प्राथमिक फेरीचा निकाल भारतीय जनता पक्षासाठी आणि ‘युती’साठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निकालाची उत्सुकता ताणली आहे. पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके दुसऱ्या फेरीत १२०० मतांनी आघाडीवर आहेत. शेवगाव मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’चे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे ६५९ मतांनी आघाडीवर आहेत. तर राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत. कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे ४०० मतांनी आघाडीवर असून शिर्डीतून ‘भाजपा’चे राधाकृष्ण विखे जवळपास चार हजार मतांनी आघाडीवर आहेत.

दगडाला पाझर फुटेल पण अजित पवारांचं रडणं ही काय भानगड? उद्धव ठाकरेंची शेलक्या शब्दांत टीका

अहमदनगर प्रतिनिधी । ‘दगडाला पाझर फुटतो हे ऐकलं होतं पण अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू येतात हे पहिल्यांदाच समजलं’ अशी शेलकी टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली. शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर येथे आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली. १५ वर्ष सत्तेत असताना … Read more

‘जागर समाज परिवर्तनाचा’ नवरात्रोत्सव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून “जागर समाज परिवर्तनाचा” या नवरात्रोत्सव विशेषांकाचा तृतीय वर्ष प्रकाशन सोहळा युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पार पडला.

भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकरराव गडाखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

थोरातांनी आत्मपरीक्षण करावं; विखेंचा थोरातांना सल्ला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखे आणि थोरात वाद सर्वानाच माहिती आहे. त्यात बुधवारी निळवंडे धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार होते. त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंच्या हस्ते भूमिपूजन ही बाब थोरात समर्थकांना खटकली. त्यामुळे त्यांनी विखे ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याला आडवे होऊन थोरात यांच्या समर्थांनी घोषणा … Read more

पाणी प्रश्नावर, भाजप आमदाराने शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावला

अहमदनगर प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक जवळ आल्याने नेवासा मतदार संघाचे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मतदार संघातील गावांना भेटी देऊन त्यांनी निववडणूक पूर्व प्रचार सुरु केला आहे. दरम्यान या दौऱ्यात अनेक मतदार आमदारांना आपल्या समस्या सांगताना दिसत आहेत. मात्र मुरकुटेंचा दौरा सुकली गावात पोहचला असतांना स्वागतासाठी उभ्या असलेल्या गावातील नागरिकांनी आमचा पाण्याचा … Read more

दीड एक्कर उभ्या सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्याने घातला नांगर

अहमदनगर प्रतिनिधी| सोयाबीन पिकाला वेळेवर पाणी मिळाले नसल्यामुळे सोयबीनच्या झाडाला शेंगाच आल्या नाही त्यामुळे दीड एक्कर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घालून नांगरून टाकले शिर्डी जवळच्या केलवड गावातील शेतकरी नानासाहेब धोंडिबा फटांगरे यांनी आपल्या दिड एकर सोयाबीन पिकात रोटाव्हॅटर घातला. पावसाचे दिवस संपत आले तरी देखील शेती लायक पाऊस झाला नाही.त्या मुळे उभ्यापिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यावर … Read more

नगरमध्ये भाजप उमेदवारांच्या मुलाखतीत धक्काबुक्की

अहमदनगर प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये आजी-माजी नगरसेविकांच्या पुत्रांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली आहे. या प्रकारानंतर पक्षनिरीक्षकानी या प्रकरणाची सारवासारव करत “हे घरातील भांडण आहे आवाज तर येणारच, पक्ष जिवंत असल्याचं हे चिन्ह आहे” असं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीने बुधवारी सकाळपासूनच अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरवात केली होती. दुपारी … Read more