पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

थकबाकी चुकवा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू ! इंडियन ऑईल कार्पोरेशनचा एअर इंडियाला इशारा

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल पुरवठा करणाऱ्या दिला आहे की, जर १८ ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा केले नाही तर ६ मुख्य विमानतळावरील इंधन पुरवठा बंद केला जाईल. अशा परिस्थितीत जर खरच इंडियन ऑईल कार्पोरेशनने इंधन पुरवठा बंद केला तर एअर इंडियाची विमाने उड्डाण कशी करणार हा प्रश्न आहे. एअर इंडियाने प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये देण्याची अट पाळली नाही. याआधी २२ ऑगस्ट रोजी कोच्ची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विशाखापट्टनम या सहा विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांसाठी इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता.

१९९८ पासून बंद पडलेली मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार

१९९८ पासून बंद पडलेली एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा १६ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. औरंगाबाद ते उदयपूरचे कमीतकमी ३ हजार ५९७ तर जास्तीत जास्त ७ हजार २८१ प्रवास भाडे राहण्यची शक्यता आहे.

वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं टरफल; ‘एअर इंडिया’ कंपनीकडून केटररला दंड

राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्यामुळे एअर इंडिया विमान कंपनीने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. पुणे – दिल्ली फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याचं कवच आढळल्याची तक्रार चव्हाण यांनी रविवारी केली होती.