दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या खिशाला कात्री !

रिलायन्स जिओ ने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर मोठी क्रांती घडवली. याचा फटका इतर कंपन्यादेखील बसला. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपला मोबाइल प्लॅन कमी पैश्यांमध्ये देण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये काही कंपन्यांना मोठा तोटा झाल्याचे देखील पाहण्यात आले. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या आता भाव वाढ करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.