राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं – अजित पवार

images

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरेंच्या मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की नाही यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभिन्नता कायम आहे. मात्र असे असतानाच माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत परत एकदा चर्चा रंगू लागली … Read more

अजित पवार जेव्हा टपरीवर थांबून पान घेतात

ajit pawar on paan stall

बारामती प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार आपल्या हटके अंदाजाने नेहमीच चर्चेत असतात. रोखठोक बोलणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जवळीक अशी ओळख असलेल्या पवार यांचा असाच हटके अंदाज शुक्रवारी पहायला मिळाला. गाडीतून प्रवास करत असताना त्यांना अचानक पान खाण्याचा मोह झाला आणि ते रस्त्यालगतच्या पान टपरीवर थांबले. बारामती येथील पणदरे … Read more

नवनीत राणा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास इच्छुक ? पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधान

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | दक्षिणाथ्य अभिनेत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नेत्या नवनीत राणा यांनी बुधवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सुनिल वर्हाडे यांच्या अमरावती येथील निवास्थानी झालेल्या या भेटीमुळे नवनीत राणा पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नवनीत राणा कौर यांनी २०१४ साली अमरावती येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या तिकिटावर … Read more

भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा – छगन भुजबळ

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. मात्र डान्स बार बंदीवर राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपुर्ण निर्णय दिला असून मुंबईसह राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री … Read more

सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी – आ. जयंत पाटील

Jayant Patil NCP

मुंबई | बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राज्यात आले खरे परंतू त्यासाठी घेतलेले कर्ज आता आपल्या राज्याच्या माथ्यावर आदळणार आहे तेव्हा सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी असे वक्तव्य करत विधिमंडळ गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more

सिंचन घोटाळा | न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत राहणार – अजित पवार

Ajit Pawar

मुंबई | ‘सिंचन घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर फार भाष्य करणार नाही अशी भुमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास अाहे, आपण सिंचन घोटाळा प्रकरणी यापूर्वी चौकशीला संपूर्ण सहकार्य केले आहे आणि यापुढेही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत राहणार आहोत’ असे मत व्यक्त केले. राज्यातील सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री … Read more

अजित पवार आणि गिरिष बापट आमने सामने, मराठा अारक्षणावरुन बाचाबाची

Ajit Pawar and Girish Bapat clash

मुंबई | विधीमंडळाच्या पायर्यांवर सत्ताधारी आक्रमक झालेले असताना आज विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधे बाचाबाची झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पावार आणि भाजपा नेते गिरिष बापट आमने सामने आल्याने सभागृहा बाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री भाषण करण्यासाठी उठले असता विरोधकांनी सभात्याग केल्याने सत्ताधार्यांची पंचाईत झाल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनी … Read more

शिवरायांच्या वेशात राष्ट्रवादीच्या आमदाराची विधानभवनात एन्ट्री

Prakash Gajbhiye NCP

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करत हटके आंदोलन केले. यावेळी त्यांनी पोकळ आश्वासने देणाऱ्या सरकारचा निषेध केला. हातामध्ये तलवार घेऊन प्रकाश गजभिये विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मराठा-मुस्लीम-धनगर आरक्षण, शिवस्मारक, कर्जमाफीच्या पोकळ आश्वासनांशिवाय जनतेला काही मिळाले नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली. तसेच, … Read more

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांचा युनिसेफकडून गौरव

Supriya Sule

दिल्ली | खासदार सुप्रिया सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोलाचे मदत कार्य केलं आहे. या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. सुप्रिया सुळे म्हणतात, युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदत कार्याची पावती आहे. केवळ … Read more

जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, अजित पवारांचा भाजप वर हल्लाबोल

Ajit Pawar

मुंबई |सुनिल शेवरे ‘मागास आयोगाचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुख्यमंत्री आरक्षणसंदर्भात कशी काय घोषणा करू शकतात?’ असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून “वा रे..फडणवीस तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल निकम्मी है जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है” अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने … Read more