व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी 22 अर्ज दाखल

aurangabad

औरंगाबाद – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा व्यापारी महासंघाची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. येत्या २१ नोव्हेंबरला अध्यक्षांसह नवीन कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी अध्यक्ष, महासचिवासह 9 पदासाठी 22 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. पहिल्यांदाच होणारी निवडणूकी चांगली रंगतदार होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली महासंघाची आतापर्यंत … Read more

मनपाच्या विनंती नंतर व्यापाऱ्यांचा बंद स्थगित; हातगाडीवाले मात्र बंदवर ठाम

औरंगाबाद – शहरातील पैठण गेट व्यापारी असोसिएशन तर्फे दुकानात समोरील हातगाडी चालकांना हटवण्याच्या मागणीसाठी 22 तारखेला पुकारण्यात आले. बेमुदत बंद आंदोलन मनपाच्या विनंतीनंतर व्यापाऱ्यांनी स्थगित केले आहे. दुसरीकडे मात्र हात गाडी चालक व्यापार यांच्याविरोधातील बंद वर ठाम आहेत. बंद शिवाय मोर्चा ही काढण्याचा निर्धार आयटक आणि नॅशनल ऑफर्स फेडरेशनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. पैठण गेट, … Read more

मनपा निवडणुकीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने थोपटले दंड; ‘इतक्या’ वॉर्डांत देणार उमेदवार

औरंगाबाद – महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी राजकीय पक्षांमधील खलबतं मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशातच आता मनपा निवडणुकीसाठी प्रथमच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने दंड थोपटले आहेत. एसडीपीआय 20 ते 25 जागांवर उमेदवार देणार आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसोबत कोणतीही आघाडी करणार नाही, असा निर्णय या पक्षाने … Read more

प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्यासाठी मागितला दहा दिवसांचा वेळ

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो 18 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने कच्चा आराखडा तयार केला आहे; पण महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सध्या दौऱ्यावर असल्याने कच्चा आराखडा पाठविण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मिळावा, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक … Read more

…अन्यथा 22 ला बाजारपेठ बंद; व्यापाऱ्यांचा मनपाला ईशारा

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी ते पैठणगेट या मार्गावर दोन्ही बाजूला फेरीवाल्यांच्या हातगाड्या लावण्यावरून व्यापारी आणि फेरीवाल्यांना मध्ये घमासान युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. फेरीवाल्यांच्या हातगाड्या हटवण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी 22 नोव्हेंबरला बाजार पेठ बंदची हाक दिली आहे, तर व्यापाऱ्यांच्या विरोधात 24 नोव्हेंबर रोजी फेरीवाल्यांनी बंद पुकारला आहे. हा प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर … Read more

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा उद्या होणार सादर

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाला कच्चा आराखडा सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक आगामी काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने पावले उचलली आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग … Read more

महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

औरंगाबाद – राज्य शासनाने गुंठेवारी भागातील डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला असतानाच महापालिकेला देखील मालामाल होत आहे. गुंठेवारी भागातील सतराशे प्रस्ताव दोन महिन्यात महापालिकेकडे दाखले झाले. त्यातील सातशे मालमत्ता नियमित करण्यात आल्या आहेत तर महापालिकेच्या तिजोरीत 17 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचे नगर … Read more

नवीन इमारतीच्या जागेसाठी मनपाची ‘शोधाशोध’

औरंगाबाद – महापालिकेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव गेल्या १० ते १२ वर्षांपासून धूळखात पडला आहे. मात्र प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी प्रशासकीय इमारतीचा विषय ऐरणीवर घेतला आहे. इमारतीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. महापालिकेने पद्मपुरा येथे पाच एकर जागा आरक्षित केली आहे. मात्र या जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे शहरात इतरत्र जागांचा शोध घेतला जात आहे. … Read more

शहराच्या एन्ट्री पॉईंटवरील कोरोना चाचण्या बंद, परंतु…

Antigen test

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे दीड वर्षांपासून सहा एन्ट्री पॉइंटवर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, खासगी बस चालकांसोबतचे वारंवारचे वाद, प्रवाशांमधून होणारा विरोध लक्षात घेता, महापालिकेने एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या बंद केल्या आहेत. असे असले तरी शहराच्या इतर भागात गर्दीच्या ठिकाणी मात्र चाचण्या सुरूच आहेत. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर … Read more

जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता मनपाचा मोठा निर्णय !

औरंगाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यानंतर ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांना दुकान, मॉल, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे प्रवेश मिळणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल मिळणार … Read more