कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान होणार- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. कोरोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची तुलना … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत गृहमंत्री देशमुख म्हणाले..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. या बातमीने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. अभिनेता सुशांतने आत्महत्या कारण्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं … Read more

मुंबई पोलिसांची गस्त झाली हायटेक; पोलिसांच्या ताफ्यात ‘सेगवे’ सामील

मुंबई । पोलीस दलासाठी उपयुक्त अशा ‘सेगवे’चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. या नवीन सेवेमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान झाले आहेत, असे अनिल देशमुख यांनी सांगितलं. या उद्घाटनावेळी आमदार रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय … Read more

सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही- अनिल देशमुख

मुंबई । सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. देशमुख यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या अशा कृत्यांची गंभीर दखल घेतली असून … Read more

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा 

श्रमिक रेल्वेतील प्रवाशांचा ८५% प्रवासखर्च केंद्र सरकार उचलत असल्याचा दावा खोटा आहे.

API कुलकर्णींचा ‘तो’ फोटो नजरेपुढून जातंच नाहीय..गृहमंत्री अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

मुंबई । कोरोना विषाणूंसोबत महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लढत आहेत. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काळ कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला … Read more

राज्यात CRPFच्या २० कंपन्या पाठवा; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई । राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या पाठवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जवळपास गेले दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर … Read more

राज्यात आत्तापर्यंत ८१९ पोलीस कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत ४ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख … Read more

महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानात सचिन, विराट, अक्षयने ठेवला ‘हा’ DP

मुंबई । देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. अशातच कोरोनासोबत दोन हात करताना खाकी वर्दीतील वीरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहे. अशा पोलीस दलातील कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले … Read more

धक्कादायक! मुंबईमधील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातील एका स्वयंपाकीच्या माध्यमातून एकाच बॅरेकमधील या ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कोरोनाबाधित कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तुरुंगात असलेल्या … Read more