खळबळजनक ! घरातच सापडला स्फोटकांचा साठा

spotke

औरंगाबाद – पैठण रोडवरील गेवराई येथील दुकान फोडल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका घरावर काळ दुपारी टाकलेल्या छाप्यात डिटोनेटर्स स्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकासह तिकडे धाव घेतली. संशयित आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. जितेंद्र ऊर्फ जितूसिंग संतोषसिंग टाक (रा. अलाना … Read more

वाळूज पोलिसांची मोठी कारवाई, ट्रक लुटणारी टोळी गजाआड; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

poliice

औरंगाबाद – पुण्याला लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला स्कॉर्पिओने आडवून लुटणाऱ्या टोळीचा वाळूज पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. या टोळीकडून तब्बल २३ लाख रूपयांच्या मुद्देमालासह चौघा दरोडेखोरांना पोलिस पथकाला अटक करण्यात यश मिळाले. तर अद्याप गुन्ह्यातील काही आरोपी फरारी आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केल्याने परिसरातून पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.ट्रकचालकाच्या … Read more

स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे दाखवणे आले अंगलट; खासदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

kale zende

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘माझे विद्यापीठ परत द्या’ या मागणीसाठी दिल्ली गेट येथे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी खासदारांसह 24 पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादला होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी … Read more

आजपासून खासगी कोचिंग सुरु करणार; भाजपप्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनचा निर्णय

private coching classes

औरंगाबाद – सरकारच्या वतीने कोरोना काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्क्लासेस बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही ती सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संचालक व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही उपासमारी थांबविण्यासाठी आजपासून शहरातील खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपप्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनने केली … Read more

…तर काँग्रेसचा शहराच्या नामकरणाला विरोध नाही – नाना पटोले

औरंगाबाद – शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी, वाढती महागाई अशा प्रश्‍नांनी जनता त्रस्त आहे. काँग्रेससाठी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. पण, या प्रश्‍नांना बगल देण्यासाठी भावनिक विषय पुढे आणले जातात. औरंगाबादचे नामकरण करून जनतेचे प्रश्‍न सुटणार असतील तर काँग्रेसचा कोणत्याही नावाला विरोध नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘व्यर्थ न हो बलीदान’ या … Read more

स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना दाखवणार ‘काळे झेंडे’

Imtyaj jalil

औरंगाबाद : राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता, असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उद्या स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहेत. अशी माहिती खासदार जलील यांनी सोशल मिडियावर एका … Read more

 चंद्रकांत खैरेंचे काम औरंगजेबासारखे; प्रशांत बंब यांचा खैरेंवर घणाघात

chandrakant khaire

औरंगाबाद – चंद्रकांत खैरेंचं काम औरंगजेबासारखं असून त्यांच्या काळात औरंगाबादचा काहीच विकास झाला नाही. खैरेंची ३० वर्षांची सत्ता औरंगाबादेत होती पण याकाळात शहर खिळखिळे झाले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याच्या विकासात अडचणी आणू नये. खैरे हे भागवत कराडांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत, असा घणाघात भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरेंनी … Read more

खळबळजनक ! तुर्काबादेत भंडाऱ्यात गावातील 70 टक्के नागरिकांना विषबाधा

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गावातील जवळपास 70 टक्के लोकांना विषबाधा झाली आहे. यामुळे गावात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांना … Read more

धक्कादायक ! ऑनलाईन गेममध्ये लाखो रूपये हरल्याने 17 वर्षीय युवकाने सोडले घर

औरंगाबाद : मागील दीड वर्षांपासून लॉकडऊन लावल्यामुळे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन गेमिंग कडे वळला आहे. अशातच ऑनलाईन ॲप मध्ये गुंतवणूक केलेले अडीच लाखांची रक्कम गेल्यानंतर आई वडील रागवले म्हणून 17 वर्षीय मुलाने चिठ्ठी लिहून सोडल्याची घटना बुधवारी एन-4 या भागात उघडकीस आली आहे. त्यानंतर गुरुवारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बारावीचे शिक्षण घेणाऱ्या … Read more

भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेची जोरदार तयारी, परळीतून होणार सुरु

BJP Flag

औरंगाबाद – केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या राज्यातील चार मंत्र्यांतर्फे त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात सोमवारपासून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील जनआशीर्वाद यात्रा ही परळीपासून सुरू होणार असून २१ ऑगस्टला औरंगाबादेत समारोप होणार आहे. पाच जिल्ह्यांतील ३२ ठिकाणांवरून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यातर्फे यात्रेचे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री … Read more