मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी मोदींनी केली ही मोठी घोषणा

औरंगाबाद प्रतिनिधी | मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पाण्याचे हे संकट दूर सारण्यासाठी येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये पाण्याच्या जलजीवन मिशन योजना राबवून या योजनेवर खर्च केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबादेत केली. मोदी हे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या ऑरिक सिटी उद्घाटन आणि महिला मेळाव्यासाठी आले असताना आयोजित कार्यक्रमात बोलत होते. … Read more

कृषी सेविकेचा स्तुत्य उपक्रम महिलांना दिले शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे

औरंगाबाद प्रतिनिधी | शिक्षक दिवस आणि महालक्ष्मी आगमनाचं औचित्य साधत एका कृषीसेविकेनं औरंगाबाद इथं महिला शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे दिले. कृषीसेविका अनिता बनकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. सध्या जिल्ह्यात मका, तूर तसंच सोयाबीन यासारख्या मुख्य जिरायती पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होतो आहे. ही गोष्ट लक्षात घेत खुलताबाद तालुक्यातल्या शुहजातपूर येथील कृषीसेविका अनिता बनकर यांनी आपल्या … Read more

माजी खासदार असा उल्लेख चंद्रकांत खैरेंना टोचला

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चार केला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले आहेत . मात्र हा पराभव खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे . कोणत्याही कार्यक्रमात आता चंद्रकांत खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख येतो. अशाच एका कार्यक्रमात खैरे या शब्दावर … Read more

पैठण तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी

औरंगाबाद प्रतिनिधी | दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यामध्ये अखेर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमाने उड्डाण घेतं दिसत आहेत. रविवारी देखील औरंगाबाद विमानतळावरून ‘क्लाउड सिडिंग’ करण्यासाठी विमाने उड्डाण घेतले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. विमानाच्या साहाय्याने ढगात ‘क्लाउड सिडींग’ करण्यात आले. या नंतर काही तासाने पैठण तालुक्यातील गोपवाडी भागात दमदार पाऊस झाला. या … Read more

कन्नड तालुक्यातील दोन युवकांचा कुंडात बुडून मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | जोरदार पाऊस झाल्याने बहरलेले नैसर्गिक सौंदर्य पाहण्याच्या उत्सुकतेपोटी फिरण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी येथे घडली. दोन युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड तालुक्यातील आंबातांडा येथील युवक योगेश विलास भोंगळे व मुंडवाडी येथील शरद रामचंद्र साळुंखे हे दोघे … Read more

काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच आता अब्दुल सत्तार यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसापासून अब्दुल सत्ता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येत असतानाच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला नक्कीच धक्का बसला असणार हे मात्र निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार … Read more

सामूहिक बलात्कार पीडितेचा अखेर मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | चेंबूर येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या १९ वर्षीय मुलीवर चार जणांनी ७ जुलै रोजी सामूहिक अत्याचार केला होता. या पीडितेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाची … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : या पक्षाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

औरंगाबाद प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला सर्वच पक्ष जोमानेभिडत असताना आता छोट्यापक्षांनी देखील निवडणुकीला चांगलाच रंग भरायला सुरुवात केली आहे. आज औरंगाबाद येथे संभाजी ब्रिगेडने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे ब्रिगेडने जाहीर केली आहेत. २२ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक … Read more

Breaking | औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागी शिवसेनेचे आंबादास दानवे विजयी

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाल्याने त्या जागी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या ताब्यात असणारी जागा आपल्या नावे करून घेण्यास यश मिळवले असून शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी काँग्रेस आघाडीच्या बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य मतदान करणात. महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेचे … Read more

वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये फुटू

औरंगाबाद प्रतिनिधी | वंचित आघाडीचा घटक असणाऱ्या एमआयएममध्ये आणि वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात पहिल्यासारखे प्रेम राहिले नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. कारण वंचित आघाडीच्या धोरणावर एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एमआयएम आणि वंचितचे नाते कसे राहील याबद्दल खात्रीलायक काहीच सांगता येणार नाही. काही दिवसापूर्वी आम्ही आम्हाला हव्या … Read more