खंडापीठाने विद्यापीठाला बजावली कारणे दर्शक नोटीस

bAMU

औरंगाबाद | विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयात पी एच डी साठी प्रवेश देण्यात यावा, या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगास कारणे दर्शक नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लढ्ढा यांनी दिला आहे. संशोधक चंद्रशेखर भाऊराव जाधव यांनी ॲड. शिरिष कांबळे यांच्यामार्फत दाखल … Read more

अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची पडताळणी न करताच विद्यापीठाची परीक्षा घेण्याची घाई

bAMU

औरंगाबाद | मे महिन्याच्या पहिल्या सत्रात सहामाही परीक्षा झाल्या नंतर दोन महिने संपताच 29 जुलै पासून दुसऱ्या सत्रातील सहामाही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परंतु अभ्यासक्रम किती पूर्ण झाला याकडे लक्ष न देता परीक्षा घेण्यात येत आहे. बीए, बीएस्सी, बीकॉम या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा 29 जुलैपासून सुरू होणार असून … Read more

विद्यापीठात घनवन प्रकल्पाला सुरुवात; 6 हजार झाडांची केली जाणार लागवड

bAMU

औरंगाबाद | वाढत्या शहरीकरणामुळे ‘सिमेंट’चे जंगल निर्माण होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि विद्यापीठ परिसर हिरवागार राहण्यासाठी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात अर्धा एकर जागेमध्ये सहा हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. कमीत-कमी जागेत जास्तीत जास्त झाडांच्या लागवडीचा मियावाकी घनवन प्रकल्प हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साकरण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते या … Read more

डॉ. बा.आ.म. विद्यापीठात यूजीसीने मनुष्यबळ विकास केंद्रात 20 कोर्सेसना दिली मान्यता

bAMU

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतील मनुष्यबळ विकास केंद्रात 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 20 कोर्सेसला मान्यता मिळाली आहे. वर्षभरातील अभ्यासवर्ग या वेळेसही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अशी माहिती संचालक डॉ. एन. बांदेला यांनी गुरुवारी दिली. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व कोर्स ऑनलाईन घेण्यात आले. विद्यापीठात तीन दशकांपासून एचआरडीसी सुरु आहे. विद्यापीठाणे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी … Read more

मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय क्रांतीकारी ठरेल – एआयसीटीई अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे

Convocation Ceremony

औरंगाबाद | नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असा विश्वास ‘एआयसीटीई‘चे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला. देशात पाच प्रादेशिक भाषेत 14 तंत्रशिचण संस्थामध्ये यंदापासून हा प्रयोग राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत … Read more

संशोधक विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! प्रबंध सादर करण्यासाठी डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

BAMU

औरंगाबाद | कोरोना मुळे एम. फिल आणि पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना तीन महिने संशोधनाचे काम करता आले नाही. या विद्यार्थ्यांना शोध प्रबंध सादर करण्यासाठी डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सोमवारी याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला डॉक्टर श्याम शिरसाट … Read more

विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर होणार छ. शिवाजी महाराजांचा पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वनस्पतिशास्त्र उद्यानात उभारण्यात येणार होता. 14 मे रोजी वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर हे भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. रिपाईचे युवक मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी या पुतळ्या संदर्भात आक्षेप घेतला … Read more