धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

पुणेरी पाट्या लावून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुणेकरांनी केला विरोध

पुणे प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या उमेदवारीला मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्याच प्रमाणे कोथरूड मधील ब्राह्मण वर्गाने देखील त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची चर्चा कोथरूड मध्ये जोर धरू लागली आहे. अशा सर्व नाट्यमय हालचाली होत असतानाच आता कोथरूडमध्ये पुणेरी पाट्या देखील झळकल्या आहेत. पुणेरी … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.

समाजवादी नागनाथअण्णा नायकवडींच्या नातूने उमेदवारीसाठी केला हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात विचारधारा रसातळाला गेल्याचा प्रत्येय २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. याचाच एक नव्याने दाखला देण्याचा प्रयत्न गौरव नायकवडी यांनी केला आहे. त्यांनी उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची घटना आज मुंबईमध्ये घडली आहे. भाजपकडून तिकिटासाठी आग्रही असणारे गौरव नायकवडी इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेत गेले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील … Read more

Breaking| अखेर आज झाली युतीची घोषणा ; जागा वाटपाचा सस्पेन्स कायम

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजपची युती आज झाल्याचे पत्रकाच्या मार्फत सेना भाजपच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रित पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करतील असे बोलले जाते होते. मात्र युतीची घोषणा एका पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. युतीची घोषणा जरी करण्यात आली असली तरी जागा वाटपाचा सस्पेन्स दोन्ही पक्षांकडून … Read more

कल्याणमध्ये युती फिस्कटली, शिवसैनिकांचं भाजपशी जमेना

प्रतिनिधी ठाणे | पश्चिम व पूर्व कल्याण विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या परिस्थितीत दोन्ही जागा शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात उमेदवार देणार असल्याचं सेनेच्या विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर,राजेंद्र देवळेकर,रवी पाटील,श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील … Read more

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल

सेना भाजप युतीचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ?

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. त्यातच गुरुवारी (२६ सप्टेंबर) दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. त्यामुळे युती झाल्यास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पुढच्या … Read more