३ हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी ,तीन हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीला एसीबीने मंगळवारी पंचासमक्ष झालेल्या कारवाईत रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे . संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी, मानवत तालुक्यातील पोहंडुळ गावचे पोलीस … Read more

जीएसटीच्या राज्य कर अधिकाऱ्यांसह दोघांना अटक; करातील त्रुटी दूर करण्यासाठी मागितली ७० हजारांची लाच

सांगली प्रतिनिधी । वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत याच्यासह कर सहायक शिवाजी महादेव कांबळे या दोघांना चाळीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. सांगली-मिरज रस्त्यावरील जीएसटी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाने ही कारवाई केली. मुल्यवर्धीत करातील त्रुटी दूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, जीएसटी विभागात प्रथमच ही घटना घडल्याने जिल्ह्यात … Read more

१ लाखाची लाच स्वीकारताना IAS अधिकाऱ्याला अटक

भुवनेश्वर : १ लाखाची लाच स्वीकारताना आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ओडिशा राज्याच्या राज्य सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. बिनय केतन उपाध्याय असे त्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. बिले मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच स्वीकरली. Odisha: State Vigilance Department today arrested Binay Ketan Upadhyay, an IAS officer in Bhubaneswar while he was accepting bribe … Read more

महाराष्ट्रातील सरकारी विभागातील भ्रष्टाचाराची आकडेवारी पहा एका क्लिकवर..

मागील वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची प्रकरणे दोन टक्क्यांनी कमी झाली असून शासकीय सेवेत असलेल्या लोकसेवकाकडून होणाऱ्या भ्रष्टाचारमध्ये पुणे परिक्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ औरंगाबाद परिक्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील चार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टचाराची सापळा कारवाई औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

लाचखोर मुद्रांक विक्रेता अटकेत, शेगाव येथे एसीबीची कारवाई

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करणाऱ्या एका इसमान दस्त नोंदणीसाठी दुय्य्म निबंधकाच्या नावान एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. हे करत असताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागान त्याला रंगेहाथ पकडलं. ही कारवाई बुधवारी सायंकाळी शेगाव इथं करण्यात आली. या कारवाईन दुय्य्म निबंधक कार्यालयाचे धाबे दणाणले आहे.

लाच घेणाऱ्या त्या वाहतूक पोलिसाची होणार चौकशी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई  अमरावती शहरात वाहन तपासणीच्या नावाखाली रक्तदान करायला जाणाऱ्या दोन तरुणांना थांबुन त्यांच्या कडून अवैध रित्या पाचशे रुपये घेऊन व त्याची कुठलीही पावती न दिल्याचा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा तो व्हिडीओ काल समाज माध्यमावर चांगलाच  व्हायरल झाल्यानंतर पैसे घेणाऱ्या त्या वाहतूक शाखेच्या  पोलीस कर्मचाऱ्याच्या चौकशीचे आदेश अमरावती शहराचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर … Read more