३ हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी ,तीन हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीला एसीबीने मंगळवारी पंचासमक्ष झालेल्या कारवाईत रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे .

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी, मानवत तालुक्यातील पोहंडुळ गावचे पोलीस पाटील लक्ष्मण उत्तमराव कोपरटकर( वय४०) हे तीन हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास देण्यात आली होती. त्यावरून मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी एसीबीने कारवाईचा सापळा रचला. यावेळी तक्रारदाराने पोलीस पाटलांना लाचेची रक्कम देण्यासंदर्भात फोन केला. सदरील रक्कम तात्काळ घेऊन येण्याचे पोलीस पाटलांनी यावेळी तक्रारदारास सांगितले होते. दरम्यान सदरील रक्कम पोटंडूळच्या पोलीस पाटलांनी पत्नी शारदा लक्ष्मण कोपरटकर ( वय ३०) मार्फत स्वीकारत असताना एसीबीने पंचा समक्ष रंगेहात पकडले. त्यामुळे पोलीस पाटील व त्यांच्या पत्नी विरुद्ध मानवत पोलीस ठाण्यामध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड व मा अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप.अधिक्षक भरत केशवराव हुबे,पोलीस निरीक्षक भुजंग विठ्ठलराव गोडबोले, पोलीस निरीक्षक अमोल कडु, पोह हनुमंते,पोना.कटारे,पोशि.धबडगे, शेख मुक्तार, पोह.शकील,जहागीरदार, पोना.कुलकर्णी, मुखीद, पोशि.चट्टे , मपोशि. टेहरे, चापोह.चौधरी, पोना.कदम परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment