Sunday, June 4, 2023

सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर प्रतिनिधी । चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये प्रेमदास भाविकदास जुमडे हे बांधकाम विभागातील आस्थापनेवर लिपिक या पदावर कार्यरत होते. तर तक्रादार वाहन चालक हे चंद्रपूर येथील रहिवाशी असून तक्रारदार यांचे सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्ती वेतन कायद्याचा प्रस्ताव तयार करण्याचा कामासाठी या सहाय्यकाने तक्रारदारकडून तीन हजाराची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदराने हि माहिती प्रतिबंधक विभागाला दिली. या तक्रारीवरून सापळा रचून अमरप्रेम जुमडे यांना तीन हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतबंधक विभागाने रंघेहात अटक केली आहे.