२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत देणार सात विशेष विमान उड्डाणांना परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासांवर निर्बंध घातल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी २१ मेपासून भारतातून सात खास उड्डाणे आयोजित केली जाणार आहे. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत एअर इंडियाची काही विशेष उड्डाणे भारतीयांना परत आणण्यासाठी घेण्यात येतील, अशी माहिती या अधिकृत अधिसूचनेत उच्चायोगाने … Read more

केंद्रानं देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं ताब्यात घ्यावं- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । केंद्र सरकारनं देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे पडून असलेलं सोनं कर्जरूपानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील अर्थकारण ठप्प पडलं असून त्याला चालना देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय केंद्र सरकारला सुचवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत … Read more

आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे … Read more

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत.

नोकरी गेली तरी घाबरू नका! मोदी सरकारची ही योजना आपल्याला देईल पुढील २ वर्षांसाठी पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. यामुळे बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे तर कुठेतरी वेतन कपात केली जात आहे. या संकटात असे कोणतेही उद्योग नाही आहेत जेथे लोकांच्या नोकर्‍यावर संकट आलेले नाही. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. आपल्याला देखील नोकरी संबंधित समस्या येत असल्यास,ही … Read more

नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे … Read more

केंद्रानं केली पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ, पण..

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारनं सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला असून, यामुळे अर्थ व्यवहाराचं चक्र जवळपास ठप्प झालं आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसूलाचा ओघ अटल्यासारखीचं स्थिती आहे. यातून मार्ग काढण्यास केंद्रानं सुरूवात केली असून, आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या … Read more

रस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात??

सरकारमधील लोकांना त्यांच्या चुकांसाठी पाठीशी घालणे हे काम ममता बनर्जींकडून होत असून सद्यस्थितीत ते धोकादायक आहे.

महाराष्ट्रावरील ‘त्या’ अन्यायकारक निर्णयाची केंद्राला मोठी किंमत चुकवावी लागेल- खासदार शेवाळे

मुंबई । केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ (IFSC) गांधींनगर गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. दरवर्षी मुंबईतून केंद्राला सुमारे पावणे २ लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, ८० टक्के म्युच्युअल फंडची नोंदणी मुंबईतुन होते. या सर्व बाबींचा विचार करता, … Read more