पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये मोठा स्फोट, CPEC शी संबंधित 9 चीनी इंजिनिअर्स ठार

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा स्फोट झाला आहे, ज्यामध्ये किमान 9 चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बलुचिस्तान पोस्टच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) शी जोडलेल्या रस्त्याच्या बांधकामात गुंतलेल्या चिनी इंजिनिअर्सच्या ताफ्यात हा स्फोट झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या आघाडीचे वृत्तपत्र ‘डॉन’ने सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,” … Read more

चीनच्या सरकारी कंपनीने टिकटॉकच्या मालकीच्या बाइट डान्स, वीबो चॅटमध्ये केली गुंतवणूक

बीजिंग । चीन सरकारने देशातील व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकच्या मालकीचे बाइटडन्स आणि चॅट अ‍ॅप वीबो या दोन अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. असे मानले जाते की, ही गुंतवणूक चीनमध्ये वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रावर प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने केली गेली आहे. सार्वजनिक सरकारी नोंदी आणि कॉर्पोरेट इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म किचाचा यांच्या मते, एप्रिलमध्ये, बाइट डन्सने आपली चीनी उपकंपनी … Read more

चीनमध्ये आढळून आली कोरोना डेल्टा व्हेरिएंटची 77 प्रकरणे, अनेक शहरांमध्ये पुन्हा केली जाणार चाचणी

बीजिंग । चीनमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे 77 नवीन रुग्ण सापडले. काही शहरांनी स्थानिक पातळीवर संक्रमण नियंत्रित करण्यासाठी पुन्हा चाचणी सुरू केली आहे. देशात 20 जुलैपासून कोरोनाचे डेल्टा व्हेरिएंटचे डझनहून अधिक शहरांमध्ये संक्रमित रुग्ण आढळले आहे. अधिकाऱ्यांनी स्थानिक सरकारांना संक्रमित लोकांचा मागोवा घेण्याचे आणि नियंत्रणाचे प्रयत्न तीव्र करण्याचे आदेश … Read more

तालिबानने दिले मैत्रीचे संकेत, म्हणाले,” भारताकडे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहत नाही”

काबूल । अफगाणिस्तानात दहशत निर्माण करणाऱ्या तालिबानने भारताशी मैत्रीचे संकेत दिले आहेत. तालिबानने म्हटले आहे की, ते भारताला पाकिस्तानच्या नजरेतून पाहत नाही. अफगाणिस्तानमध्ये भारतासह कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रकल्पांना कोणताही धोका नाही. मात्र, तालिबानने यासाठी एक अटही घातली आहे. दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे की, जर भारताने अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गोळीबाराला पाठिंबा देणे बंद केले … Read more

खुशखबर ! पेट्रोल 5 रुपयांनी होऊ शकेल स्वस्त, कच्च्या तेलाच्या किमतीत झाली मोठी घट; तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Petrol Diesel Price

नवी दिल्ली । चीनमधील कमकुवत आर्थिक वाढ, कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे आणि ओपेक+ उत्पादन वाढीच्या चिंतांमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही दिसून येईल. आता असे मानले जात आहे की, येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतील. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या घसरणीचा थेट लाभ भारतालाही … Read more

चीनच्या वुहानमध्ये एका वर्षात पहिल्यांदाच कोरोनाचे नवीन प्रकरण आढळले, आता संपूर्ण लोकसंख्येची चाचणी केली जाणार

बीजिंग । चीनच्या वुहानमध्ये एका वर्षाच्या आत कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण लोकसंख्येची कोविड-19 टेस्ट (Covid-19 Test) करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील वुहान हे असे शहर आहे जिथे सर्वांत पहिल्यांदा कोरोनाव्हायरसचा संसर्ग (Coronavirus Infection) पसरला होता आणि आता जवळजवळ एक वर्षानंतर वुहानमध्ये कोरोनाचे स्थानिक प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी पत्रकार … Read more

तालिबान नेत्याने घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट, ड्रॅगनला म्हंटले ‘विश्वासू मित्र’

बीजिंग । अफगाणिस्तानावर हल्ला करणार्‍या तालिबान्यांनी आता चीनला आपला विश्वासू मित्र असल्याचे म्हंटले आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादरच्या नेतृत्वात तालिबानी शिष्टमंडळाने बुधवारी अचानक चीनला भेट दिली आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालिबान्यांनी बीजिंगला विश्वासू मित्र असल्याचे म्हंटले आहे आणि आश्वासन दिले की, हा गट “कोणालाही अफगाणिस्तानाचा प्रदेश वापरण्यास … Read more

चीनच्या Larry Chen चा 6 महिन्यांपूर्वीपर्यंत होता जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश, आता अब्जाधीश राहिले नाहीत

नवी दिल्ली । चीनी सरकारच्या बदललेल्या नियमांमुळे Larry Chen आता अब्जाधीश राहिले नाहीत. अगदी 6 महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांचा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होता. खासगी शिक्षण क्षेत्रावर चिनी सरकारच्या कडकपणामुळे Chen यांच्या व्यवसायाची स्थिती खराब झाली आहे. Gaotu Techedu चे संस्थापक आणि अध्यक्ष, Chen यांची संपत्ती आता 33.6 कोटी झाली आहे. चीनमध्ये नवीन नियम लागू केल्याच्या … Read more

पाकिस्तानने आपला मित्र चीनला दिला जोरदार धक्का, टिकटॉक अ‍ॅपवर पुन्हा घातली बंदी

इस्लामाबाद । चीनला मोठा धक्का देत पाकिस्तानने पुन्हा एकदा टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. आक्षेपार्ह कन्टेन्ट दिल्याबद्दल पाकिस्तानने बुधवारी टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशानंतर या अ‍ॅपवर दोन दिवस बंदी घालण्यात आली होती. तथापि, इथले बरेच वकील देशातील सरकारी सेन्सॉरशिप आणि इंटरनेट आणि माध्यमांवर वेळोवेळी पाकिस्तानच्या नियंत्रणाबाबत टीका करीत आहेत. … Read more

पाकिस्तानातील दहशतवादी स्फोटानंतर चीनन थांबवले CPEC प्रकल्पाचे काम

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या उत्तरी प्रांतातील खैबर पख्तूनख्वा येथे दासू धरण बांधणारी चिनी कंपनी CGGC ने शनिवारी बस स्फोटात आपल्या इंजिनिअर्सचा मृत्यू झाल्यानंतर धरणाचे बांधकाम स्थगित करण्याची घोषणा केली. बुधवारी, खैबर पख्तूनख्वा येथे प्रवासी बसमध्ये झालेल्या स्फोटात नऊ चिनी इंजिनिअर्ससह 13 जण ठार तर अनेकजण जखमी झाले. अप्पर कोहिस्तान जिल्ह्यात ही बस दासू शहराकडे जात असताना … Read more