राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली वृत्तसंस्था: दिवसेंदिवस देशात कोरोनाचा कहर वाढतच आहे. अशात केवळ सामान्य नागरिक नव्हे तर अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटिंना देखील कोरोनाने गाठले आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘ कोविड टेस्ट केल्यानंतर आज माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह … Read more

फटाका कंपन्यांच्या संघटनेने म्हटले की,”10 हजार लोकं बेरोजगार होतील”

Crackers Free Diwali

नवी दिल्ली । फटाक्यांवरील बंदीची (Firecrackers Ban) याचिका मागे घेतल्यानंतर आता नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (NGT) स्वतः या प्रकरणात दखल घेतली आहे. NGT ने आता या प्रकरणात सर्व राज्यांकडून जाब विचारला आहे. राज्यांना उत्तर दाखल करण्यासाठी शुक्रवार संध्याकाळपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावर, क्रॅकर्स असोसिएशन म्हणते, “10 हजार लोकं क्रॅकर कंपन्यांशी जोडलेले आहेत. या बंदीमुळे हे … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

राजस्थान: गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला; सचिन पायलट म्हणाले..

मुंबई । राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. राजस्थान विधानसभेतील विरोधी बाकावरील भाजपने आणलेल्या विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत आवाजी मतदान घेण्यात आलं. अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान विधानसभा अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. Chief Minister Ashok Gehlot led #Rajasthan Government wins vote of … Read more

महिन्यभरच्या तीव्र संघर्षानंतर संचित पायलट-अशोक गेहलोत यांचे मनोमिलन

जयपूर । राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या शिष्टाईमुळे काँग्रेस नेते सचिन पायलट यांचं बंड शमलं. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. यानंतर सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. बंड शमल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पायलट हे गेहलोत यांच्या भेटीला पोहचले आहेत. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात काय रणनीती आखायची … Read more

राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या अडचणीत वाढ; भाजपा अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

जयपूर । गेल्या महिन्यात झालेलं सचिन पायलट यांचं बंड, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती. शमलेलं बंड. यानंतर राजस्थानातील गेहलोत सरकारच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे भाजपच्या अविश्वास प्रस्तावाची. भाजप गेहलोत सरकारविरोधात उद्या अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होते आहे. या अधिवेशनातच भाजपकडून हा अविश्वास प्रस्ताव … Read more

अखेर काँग्रेसची मागणी मान्य! राज्यपालांनी दिले गेहलोत सरकारला अधिवेशन बोलवण्याचे आदेश

जयपूर । गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या संघर्षता वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. विशेषतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आक्रमक झालेले बघायला मिळाले. राज्यपालांनी सुरूवातील नकार दिल्यानंतर संपूर्ण काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेसच्या लढ्याला अखेर यश मिळालं असून राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अधिवेशन न घेण्याचा … Read more

ट्विस्ट! राजस्थान विधानसभा अध्यक्षांकडून सचिन पायलटांविरोधातील याचिका मागे

जयपूर  । राजस्थानच्या सत्तासंघर्षाने कमालीची कलाटणी घेतली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सोमवारी सचिन पायलट यांच्यासह १८ बंडखोर आमदारांविरोधात केलेली याचिका मागे घेतली. सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर विधानसभा अध्यक्षांनी बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, … Read more

भाजपने संविधानाला सर्कस, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे- काँग्रेस

नवी दिल्ली । राजस्थानमधील सत्तासंघर्ष अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. दरम्यान, भाजप पुरस्कृत काँग्रेस आमदारांच्या घोडेबाजाराच्या मुद्द्यावरून हा संघर्ष विकोपाला जात आहे. या सत्तानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिग सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. सुरजेवाला … Read more

.. तर मी त्यांचे स्वागत करेन; मुख्यमंत्री गेहलोतांनी दिले पायलट यांना परतण्याचे संकेत

जयपूर । राजस्थानातील सत्तासंघर्ष अजूनही संपला नाही आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील मतभेद उफाळून आल्यानंतर मोठ राजकीय नाट्य उभं राहिलं. सध्या हा राजकीय संघर्ष न्यायालयात पोहोचला असून, काँग्रेसला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष मिटण्याची शक्यता कमी असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना सरकारमध्ये संधी देण्यास संमती … Read more