रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

औरंगाबाद – शहरातील सिडको बसस्टँड ते हर्सुल टी पॉइंटच्या रस्त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्याची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले खड्डे तत्काळ बुजवावेत. त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्थित रोलिंग करून घ्यावी. मोठ्या खड्ड्यांमध्ये खडीचा वापर करण्यात … Read more

हातात दांडा घेत महिलेने गाठले थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दालन !

औरंगाबाद – आमदार गावाबाहेर काढण्याची भाषा करतोय, पोलिसही माझी तक्रार घेत नाही, माझी जमीन नावावर करून घेत, मला भिकेला लावले.” असा आरोप करत एक महिला हातात दांडा घेऊन मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालनासमोर समोर उभी ठाकून न्याय मागत होती. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली … Read more

शरद पवार यांचा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून गाैरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील गोंदी गावचे सुपुत्र व दापोली (जि. रत्नागिरी) येथे उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या शरद भगवान पवार यांना तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल गौरविले आहे. श्री. पवार यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण येथील छत्रपती संभाजी विद्यालय व कृष्णा महाविद्यालयात झाले आहे. शरद पवार यांनी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात कृषी … Read more

यंदाही दहीहंडीवर कोरोनाचे सावट

dahihandi festival

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. सध्या कोणाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. सोमवारी जिल्हानिहाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत … Read more

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी

Sunil chavhan

औरंगाबाद : जिल्ह्यात कोवीड संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत कोविड आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना सूचित केले. जिल्ह्यात सर्व व्यवहार खुले करण्यात आल्याने संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन चाचण्या आणि … Read more

कोविड केअर सेंटरबाबत जिल्हा प्रशासन आणि गरवारे कंपनीत सांमजस्य करार

औरंगाबाद – जिल्हा प्रशासन आणि गरवारे कंपनीच्या बाल कोविड केअर सेंटरबाबत सांमजस्य करार झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि गरवारे कंपनीचे संचालक एस.व्ही.आमलेकर यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील गरवारे कंपनीमध्ये बालकांसाठी कोविड केअर … Read more

बोंडारवाडी, भुतेघर, सांडवली गावाचे कायमच पुनर्वसन करावे : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | अतिवृष्टीत डोंगर कडा अथवा दरड कोसळून पाटण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात ज्या दुर्घटना घडल्या तशा दुर्घटना जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भुतेघर आणि सातारा तालुक्यातील सांडवली येथे घडण्याची भीती आहे. जीवितहानी टाळण्यासाठी या तीनही गावांचे कायमच पुनर्वसन तातडीने करावं, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन सूचना जारी

Corona 3rd way

औरंगाबाद | सध्या संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. आता दुसरी लाट संपुष्टात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. म्हणूनच प्रशासनाने या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. जिल्ह्यात शनिवारी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 … Read more

आता कोणत्याही राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

Grain

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे बर्‍याच जणांचे रोजगार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असलेल्याची स्थिती बिकट आहे. गरिबांना मदत मिळण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना पाच किलो धान्य मोफत मिळेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. या … Read more

आता अजिंठा लेणीत फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश

Ajanta caves

औरंगाबाद | जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत आता दररोज सुरू राहणार असून प्रतिदिन फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. आता लेणी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पर्यटकांसाठी सुरू असणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना सकाळी सात ते चार वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यापूर्वी लेणीमध्ये दोन हजार पर्यटकांना प्रवेश … Read more