कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सचिन तेंडुलकरने दान केले ५० लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ … Read more

लाॅकडाउन मध्ये बाहेर पडणार्‍यांच्या कपाळावर पोलिसांकडून मारला जातोय ‘हा’ शिक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरात राहण्यास सांगितले गेले आहे. परंतु बर्‍याच ठिकाणाहून लॉकडाऊनचे नियम मोडल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू पोलिसांनी लॉक-डाऊन नियम फोडून घराबाहेर पडलेल्या लोकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांच्या डोक्यावर आणि हातावर पोलिस शिक्के मारत … Read more

महाराष्ट्र सरकार ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की ११,००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कैद्यांना सरकार पॅरोलवर सोडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी वर्षा लॉन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेताना राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार … Read more

शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं. यावेळी त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली. यंदा कोरोनामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करणं शक्य नाही आहे. त्यामुळं … Read more

कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत कपिल शर्मा-हृतिक रोशनने केली मदत,दिली लाखोंची देणगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि अत्यावश्यक सेवांशी जोडलेले लोक या संघर्षासाठी सातत्याने पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. या विषाणूमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, तर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना दुहेरी मरणाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कॉमेडियन कपिल शर्माने देशाच्या कोरोनासाठी सुरू झालेल्या या … Read more

लॉकडाऊनमुळे विजेच्या मागणीत मोठी घट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू जाहीर झाल्यापासून विजेच्या मागणीत घट झाल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे २२ टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. २० मार्च रोजी १६३.७२ गिगा वॅटच्या तुलनेत बुधवारी १२७.९६ गिगा वॅटपर्यंत विजेचा वापर कमी झाला आहे. याचाच अर्थ लॉकडाऊन दरम्यान देशातील वीजपुरवठ्याच्या मागणीत ३५ गिगा वॅटची घट झाली आहे. काय … Read more

कोल्हापूरात रक्ताचा तुटवडा; संचारबंदीत शेकडो तरुणांच रक्तदान करत ठेवला आदर्श

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर गेले काही दिवस कोरोनासंबंधी चिंताजनक बातम्या आपण ऐकत-वाचत आहोत. मात्र या काळातही एक सामाजिक भान असलेली एक पॉझिटिव्ह स्टोरी कोल्हापूरच्या गाढहिंग्लजमधून समोर आली आहे. एकीकडे कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडासुद्धा जाणवत आहे. आशा परिस्थितीत गडहिंग्लजचे नगरसेवक महेश कोरी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. कोरोना व्हायरसमुळे … Read more

मोदींच्या हाती कोल्हापूरचे डिझाईन; विकास डीगेची क्रिएटिव्हिटी झळकली देशभर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर या शहराला कलेचे माहेरघर म्हणतात. याची प्रचिती वारंवार येतच राहते. अश्याच एक कोल्हापूरच्या हरहुन्नरी कलाकाराची कलाकृती देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दाखवली. जनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतर या निर्णयाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या क्रियेटीव्हीटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्याने कोरोना विषाणूचे चित्र वापरून कोईभी रोडपे ना आये. असे सूचक आणि … Read more

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता २४ तास सुरु राहणार- मुख्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळं लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंची सर्व दुकान २४ सुरु ठेवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. वर्षा निवासस्थानी करोना उपाययोजनांसंदर्भात आज मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आला. गेले काही दिवस दुकानांवर होणारी गर्दी पाहता याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

दिलासादायक! महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सर्वाधिक करोना बाधित हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आता शंभरी पार केली आहे. तर चार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत एक दिलासादायक गोष्ट आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवार पुण्यात दोन करोनाबधित रुग्णांना घरी … Read more