राज्यात आज सर्वाधिक ३ हजार ६०७ कोरोनाग्रस्तांची वाढ; एकुण रुग्णसंख्या ९७, ६४८

वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेच आहे. आता ही संख्या १ लाखाच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. जर अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर लवकरच आपण लाखांच्या घरात जाऊन बसणार आहोत. आज दिवसभरात राज्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. हे चित्र राज्यासाठी खूप चिंताजनक आहे. एका दिवसात राज्यभरात ३६०७ रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच … Read more

भारत पुन्हा ‘डेंजर झोन’मध्ये ? नोमुराचा अहवाल; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता, ज्यामध्ये आता हळहळू शिथिलता आणली जात आहे, मात्र असे असले तरी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढच होताना दिसते आहे ज्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा घेतलेला हा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका संस्थेनं … Read more

आजी माजी आमदार, खासदारांचे वेतन कपात करून कोरोना योद्ध्यांना वेळेवर मानधन द्या – भीम आर्मी 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | सध्या कोरोना संकटामुळे दोन महिने संचारबंदी असल्याकारणाने राज्यातील कामकाज बंद होते. सध्या हळूहळू कामकाज सुरु झाले असले तरी राज्याची आर्थिक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. त्यामुळे शासकीय नोकरदारांच्या पगारात कपात करण्यात येत आहे. यासंदर्भात भीम आर्मीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शासकीय नोकरदारांचे पगार … Read more

अमेरिकेतील गेम डिझायनर तरुणाने बनवला LED मास्क; तुम्ही बोलताय कि हसताय ‘हे’ समजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूचा या साथीच्या रोगाला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळालेले आहे परंतु केवळ तेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नाही आहे. एका ताज्या अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, लॉकडाउन बरोबरच फेस मास्क लावला तर हे टाळता येते. जरी बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहेत, मात्र सोशल … Read more

लॉकडाउनमध्ये टाटा मोटर्सची मोठी ऑफर; ‘या’ गाड्यांवर बिग डिस्काऊंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरु झाल्यामुळे ऑटोमोबाईल व्यवसाय एप्रिलपासून पूर्णपणे बंद झाला होता. मे महिन्यात मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे आपल्या वाहनांची विक्री वाढविण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात अनेक आकर्षक ऑफर आणत आहेत. अशा परिस्थितीत जून महिन्यात भारतीय कंपनी टाटा मोटर्सने कारच्या विक्रीसह पुन्हा एकदा आपला व्यवसाय सुरू … Read more

रोहित पवारांनी केंद्र सरकारला हात जोडून केली ‘ही’ विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. देशातील लाखो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील नागरिक रोजगाराच्या चिंतेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यांनी मनरेगासारख्या योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात राबविण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी या ट्विट मध्ये सरकारला हात जोडून विनंती … Read more

महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करावी; जनता दल (सेक्युलर) ची मागणी

मुंबई । कोरोना संकटामुळे राज्यातील महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अद्याप महाविद्यालये सुरु होण्याचीही शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी निराशेत आहेत. याला अनुसरून जनता दल (सेक्युलर) विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करण्याची मागणी केली आहे. महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला असता – जितेंद्र जोशी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अडीच महिने राज्यातील कोरोनाची स्थितीचे राजकारण केले जात आहे. रोज नव्याने ठाकरे सरकारवर आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या. यासंदर्भात एका वृत्तपत्राच्या ऑनलाईन मुलाखतीत अभिनेता जितेंद्र जोशी याला प्रश्न विचारला असता त्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मत मांडले आणि मुख्यमंत्र्यांच्या जागी दुसरे कोण असते तर डोक्याला हात लावला … Read more

‘या’ देशात केवळ ९०० रुपयांसाठी पालकच करतायत आपल्या मुलांचे लैंगिक शोषण; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपीन्स जगभरात मुलांची पॉर्न इंडस्ट्री आणि मुलांच्या ऑनलाइन सेक्स रॅकेटसाठी कुख्यात आहे. कोरोनाव्हायरसमुळे, आता फिलिपिन्समध्ये लॉकडाउन सुरू आहे, ज्याचा थेट फायदा या कुख्यात उद्योगाला होत आहे. गरीबी आणि उपासमारीमुळे इथली परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की फक्त १० ब्रिटिश पौंडमध्ये म्हणजे ९६० रुपये देऊन पालक आपल्या स्वत: च्याच मुलांचे लैंगिक शोषण … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more