ट्रेन चालू करण्याबाबत रेल्वेचा स्पेशल प्लान? लागू होऊ शकतात हे ५ नवे नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत आपल्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केलेल्या आहेत. इतकेच नाही तर ३ मे नंतर करण्यात येणारे रेल्वेचे रक्षणही थांबविले आहे.रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे हे त्यामागचा उद्देश आहे. ४ मे नंतर लोकांनी कोणताही अंदाज वर्तवू नये किंवा रेल्वे स्थानकांकडेही जाऊ नये.लॉकडाउननंतर जेव्हा कधी गाड्या सुरु होतील तेव्हा … Read more

आभाळ जरी कोसळलं तरी….अभिनेता सुबोध भावे यांना आली टिळकांची आठवण

मुंबई |आत्ताची आजूबाजूची परिस्थिती बघितली की लोकमान्य यांचं एकचं वाक्य आठवतं “कितीही संकटं आली,आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी! या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद सर्वाना मिळो हीच प्रार्थना’ अशी पोस्ट अभिनेता सुबोध भावे यांनी शेअर केली आहे. लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या नागरिकांसाठी … Read more

महाराष्ट्र नाही तर देशातील ‘या’ राज्यात सर्वात वेगाने पसरतोय कोरोना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २३ हजाराहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झालेली आहे. दरम्यान, देशभरात चालू असलेल्या या लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत आयआयटी दिल्लीने डेटाच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. यानुसार, कोरोनाचे दोन तृतीयांश रुग्ण हे देशभरातील या … Read more

लॉकडाउनमध्ये ‘या’ अभिनेत्रीने केलं टक्कल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री ज्योर्तिमयी हिने लॉक डाऊन मध्ये टक्कल केल आहे. सध्या ज्योर्तिमयीचा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा लुक पाहून चाहते फार हैराण झाले आहेत. तिचा पती अमलने त्याच्या इन्स्टाग्रामवर बायकोचा हा नवीन लुक शेअर केला. ज्योर्तिमयीने आपल टक्कल का केलं ? हे मात्र अजून कळू … Read more

VIDEO: रमजान का मतलब ही सब्र है, सांगत विश्वास नागरे पाटलांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा..

नाशिक । रमजानचा पवित्र महिना २४ एप्रिलला चंद्र दर्शनासह सुरू झाला आहे. चंद्र दर्शनानंतर लोकांनी एकमेकांना रमजानसाठी शुभेच्छा दिल्या. रमजान महिना येताच लोक खुश असतात, पण यंदा मात्र करोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे सर्व सण-उत्सवबरोबरच रमजानच्या पवित्र महिन्यावर विरजण आलं आहे. अशावेळी नाशिक शहरामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करत नाशिक पोलिस … Read more

दिलासादायक! देशातील कोरोना रुग्ण वाढ दरात मोठी घसरण

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णावाढीच्या दरात मोठी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात महिन्याभरापूर्वी लॉकडाउन जाहीर केला, त्यावेळी देशभरात करोना रुग्णांची संख्या केवळ ५०० इतकी होती. मात्र, ही संख्या पुढे वाढत जाईल यांचे संकेत तेव्हाच मिळत होते. त्यानुसार, २४ मार्च या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची दिवसाला सरासरी वाढ २१.६ टक्के इतकी नोंदवण्यात आली … Read more

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ८१७ वर

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसून राज्यातील को रोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले असून १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३१० झाली असून ९५७ जणांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) परीक्षांचे निकाल पुढे ढकलले

नवी दिल्ली । कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने परीक्षांच्या निकालांसंबधी एक परिपत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)च्या या परिपत्रकानुसार, ज्युनिअर इंजिनीअर २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २ आणि सीजीएल २०१८ टीयर ३ चा निकाल स्थगित करण्यात आला आहे. आयोगाने सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात … Read more

आजपासून देशभरातील दुकाने उघडणार; मात्र मॉल्स, मद्यविक्रीची दुकानं बंदच

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. देशभरातील दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. शहरांमधील बाजारपेठांमधील दुकाने सोडून बाकी दुकाने उघडण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबत मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारनं आता दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. … Read more

योगी सरकार मजुरांची घरवापसी करणार..

लखनऊ  । लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना परत आणणार असल्याचं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.योगी आदित्यनाथ यांनी मागील आठवड्यात राजस्थानातील कोटा इथे अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना खास बसची सोय करुन आपापल्या घरी परत आणलं. त्यानंतर इतर राज्यात अडकलेल्या मजुरांनांही परत आणणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला नियोजन करण्याच्या … Read more